"शरद पवारांपेक्षा पडळकरांना राजकीय उंची जास्त झाल्याचं वाटतं का? लाळघोटेपणा करू नका"

'गोपीचंद पडळकरांनी हिम्मत असेल तर संसदेच्या आवारात अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसवून दाखवावा.'
Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV
Published On

पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (AhilyaDevi Holkar) यांचा पुतळा अनावरण कार्यक्रम सांगलीत (Sangli) आयोजित करण्यात आला आहे. 2 एप्रिलला शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मात्र या कार्यक्रामास भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पवारांकडून पुतळ्याच अनावरण करण्याला विरोध केला आहे तसंच पवारांच्या आधी या पुतळ्याचं अनावरण मेंढपाळांच्या हस्ते करण्याच्या तयारीत पडळकर असल्याची माहितीसमोर येत आहे. दरम्यान पडळकरांच्या याच भूमिकेवर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी टीका केली आहे.

ते म्हणाले, गोपीचंद पडळकरांनी हिम्मत असेल तर संसदेच्या आवारात अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसवून दाखवावा असं आवाहन दिलं आहे तसंच पडळकरांना आपली राजकीय उंची फार मोठी झाली वाटते म्हणून अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकचे उदघाट्न आदरणीय शरद पवार साहेब (Sharad Pawar) यांच्या अगोदर करण्याचे ठरवले आहे.

दरम्यान, येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू अशी फुकटेगिरी का दाखवता, केवळ देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दाखविण्यासाठी लाळघोटेपणा करू नका. हिम्मत असेल संसदेच्या आवारात अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसवून दाखवा अशी घणाघाती टीका खरात यांनी केली आहे.

पवार पडळकर वाद जुनाच -

यापूर्वीही जेजुरी संस्थानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जेजुरी इथं पुर्णाकृती पुतळा उभारला होता या पुतळ्याच्या अनावरणाच्या आदल्या दिवशीच पडळकरांनी स्वत: मेंढपाळ आणि महिलांना सोबत घेऊन पुतळ्याचं अनावरण केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी विरूद्ध पडळकर अशा वादाला तोंड फुटलं होतं. त्याच पार्श्वभूमिवर आता पुन्हा पडळकरांनी शरद पवारांना होळकरांच्या पुतळ्याच अनावरण करू देणार नाही असा पवित्रा घेतला आहे. तसचं हा विरोध पवार या व्यक्तीला विरोध नसून प्रवृत्तीला असल्याचं पडळकर म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com