सुजित झावरे
सुजित झावरे 
महाराष्ट्र

पारनेरचे राजकारण वैचारिकता सोडून वैयक्तिक झाले

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर ः पारनेर तालुक्यात पूर्वी राजकारणातील लढाई ही वैचारिक मुद्द्यावर चालायची. परंतु गेल्या दोन वर्षांपासून राजकारणातील लढाई ही वैचारीक नव्हे तर वैयक्तिक झाली आहे, ही बाब समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. आमचा तालुक्यातील राजकारणात लढा हा वैचारिक आहे, वैयक्तिक नव्हे, असे निरीक्षण जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी व्यक्त केले.

जाधववाडी (ता.पारनेर) येथे झावरे यांच्या विशेष प्रयत्नांतून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोल्हापुरी पध्दतीच्या बंधा-याकरीता 20 लाख रूपये मंजूर झाले. त्याचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.The ideology in the politics of Parner taluka is over

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. आझाद ठुबे होते. भाजपा तालुकाध्यक्ष वसंत चेडे, अश्विनी थोरात, गंगाराम बेलकर, सुनील थोरात, सागर मैड, लहू भालेकर, पंकज कारखिले, बाळासाहेब रेपाळे, शिवाजी औटी, विठ्ठल जाधव, उषा जाधव, सुभाष दुधाडे, सतीश पिंपरकर, सचिन ठुबे उपस्थित होते.

झावरे म्हणाले, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून परिसरातील लोकांच्या हिताचं विधायक काम करीत आहे. राजकारणाच्या वाटचालीत अनेक चढ-उतार सुरू असतात. मात्र, विकास आणि समाजहित साधून राजकारण करण्याला मी पहिली पसंती दिली आणि त्यावर आग्रही राहिलो.The ideology in the politics of Parner taluka is over

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT