Rajya Sabha Elections  Saam Tv
महाराष्ट्र

Rajya Sabha निवडणुकीत दगा; अपक्ष आमदारांना निधी न देण्याचा विचार; काँग्रेस नेत्याचा इशारा

'कालच्या निवडणुकीत मतदान करताना विचार केला गेला नाही यापुढे अपक्ष आमदारांना निधी दिला जाणार नाही.'

संजय जाधव

बुलडाणा : काल पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये (Rajyasabha Election) भाजपने सहाव्या जागेवर विजय मिळवला. मात्र, भाजपचा हा विजय महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव करत भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे जवळपास ४१ मतांनी विजयी झाले. त्यामुळे बहुमताचा दावा आणि पुरेशा मतांची जुळवाजुळव केली असताना देखील पवाराभव कसा झाला याच चर्चा आघाडीच्या नेत्यांमध्ये सुरु असतानाच आता राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्य मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

'ज्या आमदारांनी काल पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ज्यांनी दगा दिला, त्यांना आता निधी देताना विचार करावा लागेल, आतापर्यंत अपक्ष आमदारांना झुकत माप दिलं, विकासाच्या कामे आमच्या बरोबरीने करवून घेतले आणि कालच्या निवडणुकीत मतदान करताना विचार केला गेला नाही. यापुढे अपक्ष आमदारांना (Independent MLA) निधी दिला जाणार नाही.' असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. ते बुलडाणा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

पाहा व्हिडीओ -

वडेट्टीवार यांनी अपक्ष आमदारांना निधी न देण्याचा इशारा दिला असला तरी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मात्र आघाडीतील आमदारांची नाराजी दूर करावी असा सबुरीचा सल्ला दिला आहे.

भुजबळ म्हणाले, 'सरकार असताना आम्ही १७० ऐवजी १८० मतांची बेरीज करायला पाहिजे होती. त्यात आम्ही निश्चित कमी पडलो, तसंच तिन्ही पक्षाच्या आमदारांची नाराजी मोठ्या प्रमाणावर उफाळून आली आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक आमदार हा आपल्याच पक्षाचा आहे असं समजूनच काम करायला पाहिजे. आमदार दुखावला जाणार नाही, त्यांच्या कामात अडथळा निर्माण होणार नाही ही शिकवण आम्हाला मिळाली आहे असंही भुजबळ म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT