मुख्याध्यापकाने केली पालकांना शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल झाल्याने समोर आली बाब ! संतोष जोशी
महाराष्ट्र

मुख्याध्यापकाने केली पालकांना शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल झाल्याने समोर आली बाब !

मुख्याध्यापकाने अश्लील भाषेत शिविगाळ करुन धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : शाळेत उशिरा का म्हणून जाब विचारणाऱ्या पालकालाच मुख्याध्यापकाने अश्लील भाषेत शिविगाळ करुन धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मुगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली असून नजीर अहमद शेख असं या मुख्याध्यापकांच नाव आहे.

हे देखील पहा -

शाळेत उशीरा का आला जाब विचारत असतना मुख्याध्यापकाने केलेल्या शिवीगाळीचा सबंधीत पालकांनी व्हिडिओ केला होता तो त्यांनी सोशल मिडीयावरती व्हायरल देखील केला होता त्यामुळेच या प्रकरणाची गंभीर दखल शिक्षण विभागाने घेतली. आणि पालकाला शिवीगाळ करणाऱ्या मुख्याध्यापक नजीर अहमद शेख ला गट शिक्षणाधिकाऱ्यांनी निलंबित केलं.

कोरोनामुळे अगोदरच दिड वर्षापासून शाळा बंद आहेत अशातच मुख्याध्यापकाचे पालकाचे अशा प्रकारचे वर्तन विचार करायला लावणारे असून अशा प्रवृत्ती वरती कठोर कारवाई करण्यात यावी असा पालकवर्गाचा सुर आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT