The difficulties of Adv Gunratan Sadavarte increased
The difficulties of Adv Gunratan Sadavarte increased Saam Tv
महाराष्ट्र

सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या; साताऱ्यानंतर आता अकोला, कोल्हापूर पोलिसही ताब्यासाठी हजर

सुरज सावंत

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या घरावर हल्ला करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना उकसवल्या प्रकरणा आणि हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या अडचणींत सातत्याने वाढ होत आहे. सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा घेतला होता. आता सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा आर्थर रोड जेल प्रशासनाला दिला आहे. काल (१८ एप्रिल, सोमवार) रात्री ११ वाजता सदावर्तेंना आरर्थरोड जेलमध्ये वैद्यकीय तपासणी करून आणण्यात आले. लवकरच सदावर्तेंचा ताबा अकोला पोलिस मागण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर पोलिसांच एक पथकही सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे. त्यामुळे सदावर्तेंच्या अडचणींत वाढ झाली आहे. (The difficulties of Adv Gunratan Sadavarte increased; After Satara, now Akola, Kolhapur police are also present for the arrest)

हे देखील पहा -

कोल्हापूरात सदावर्तेंवर गुन्हा दाखल:

मुंबई, सातारा नंतर आता कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यातही सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.द.वि.स कलम 153 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल, एकोप्याला बाधा येईल अशी कृती केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मराठा क्रांती मोर्चा चे दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मराठा आरक्षण विरोधी न्यायालयीन लढा लढण्यासाठी सदावर्ते यांनी बेकायदेशीरपणे पैसे जमवण्याचा तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तींचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

साताऱ्यात सदावर्तेंवर गुन्हा दाखल:

खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत अपशब्द वापरुन सदावर्ते यांनी टीका केली हाेती. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधाने केली हाेती. मराठा आरक्षणालाही त्यांचा विराेध हाेता. सदावर्ते यांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्याने स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी त्यांच्या विराेधात २०२० मध्ये सातारा शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. या गुन्ह्या प्रकरणी त्यांना गुरुवारी सातारा पाेलिसांनी ताब्यात घेतलं हाेते.

बीडमध्ये सदावर्तेंवर गुन्हा दाखल:

भाजपचे तालुका अध्यक्ष स्वप्निल गलधर यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधामध्ये बीडच्या (Beed) शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. यामध्ये सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे, मराठा (Maratha) समाजाला अत्याचारी समाज असे संबोधित करणे, आरक्षणासंदर्भात वेळोवेळी मराठा समाजाचा अपमान करणे, त्याचबरोबर चर्चेत राहण्यासाठी माध्यमांसमोर जाऊन मराठा समाजाच्या भावना वारंवार दुखावणे आदी बाबींची तक्रार स्वप्निल गलधर यांनी बीड पोलिसात दिली होती.

याच तक्रारीवरून शिवाजीनगर (Shivajinagar) पोलिस ठाण्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सदावर्ते यांना तात्काळ अटक न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा स्वप्निल गलधर यांनी दिला आहे. डंके की चोट पर आम्ही सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे असे देखील यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT