आता शहरातील मृत पशूंवर होणार अंत्यसंस्कार  अरुण जोशी
महाराष्ट्र

आता शहरातील मृत पशूंवर होणार अंत्यसंस्कार

मृत पशू वर अंत्यसंस्कार करण्यासाठी मनपा प्रशासनाने डेपोवर डिझेल पशू शवदहिनीचे काम सुरू केले आहे.

अरुण जोशी

अरुण जोशी

अमरावती : अमरावती Amravati शहरातील सुकळी कंपोस्ट डेपोवर सातत्याने मृत पशू नेऊन टाकले जातात. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मनपा प्रशासनाने डेपोवर डिझेल पशू शवदहिनीचे काम सुरू केले आहे. यामुळे पशू मेल्यानंतर जी दुर्गंधी पसरते व प्रदूषण निर्माण होते त्याला आळा बसणार आहे. The dead animals in the city will be cremated

सुकळी डेपोतील ६० हजार चौरस फूट जागेत कत्तलखाना तसेच स्वतंत्र पशू शवविच्छेदन रूमही तयार केली जात आहे. त्यामुळे शहरातील पशूंच्या मृत्यूचे कारण कळणार असून, नेमक्या कोणत्या आजारामुळे या पशूचा मृत्यू झाला किंवा त्याला मारण्यात आले, याबाबत शहानिशा होणार आहे.

हे देखिल पहा -

शहरात दररोज किमान ८ ते १० पशू मरतात. विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या पशूंचे शव कंपाेस्ट डेपोत आणून ते तसेच फेकले जातात. त्यामुळे या पशूंच्या शरीराची नंतर विटंबणा होते. संपूर्ण परिसरात सडलेल्या मांसाची दुर्गंधी पसरते. यापासून सुटका व्हावी म्हणून सुकळी डेपोत डिझेल पशू शवदाहिनी बसवण्याचे काम वेगात सुरू आहे.

त्यामुळे साहजिकच प्रदूषणही कमी होणार आहे. मृत पशूचे शव डिझेल दाहिनीत जाळून नष्ट केले जातील त्यासाठी डिझेल पशू शवदाहिनी शहरात दाखल झाली आहे. सुकळी कंपोस्ट डेपोवर मोठ्या प्रमाणात मृत पशू आणून टाकले जातेत. त्यांच्यावर क्रियाकर्म करण्यासाठी डिझेल पशू शवदाहिनीचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरच हि दाहिनी कार्यान्वित होईल अशी माहिती अमरावती महानगरपालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी डाॅ. सचिन बोंद्रे यांनी सांगितले.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवार १५ हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT