Pandharpur Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur News: अधिक मासनिमित्त पंढरीत भाविकांची मांदियाळी, जाणून घ्या दर्शनाची नवी वेळ

दर तीन वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासाच्या निमित्ताने पंढरीत भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.

भारत नागणे

Pandharpur News Today: दर तीन वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासाच्या निमित्ताने पंढरीत भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. येणाऱ्या भाविकांना विठुरायाचे सुलभ दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीने आता दीड ते दोन तासांनी दर्शनाची वेळ वाढवली आहे. या वाढीव वेळेमुळे अधिकाधिक भाविकांना दर्शनाचा लाभ होत आहे. (Latest Marathi News)

इतर वेळी मंदिर रात्री साडेदहा वाजता बंद केले जाते. मात्र अधिक मास सुरू झाल्यापासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिक - श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार असल्याने पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे.

अधिक महिना पवित्र काळ समजला जातो. या महिन्यामध्ये चंद्रभागा स्नान आणि विठ्ठल दर्शन‌ महत्वाचे मानले जाते. अधिक श्रावण असल्याने आज पहाटे पासूनच भाविकांची मंदिर परिसरात दर्शनासाठी रीघ लागली आहे. दर्शनाची रांग मंदिरा पासून एक किलोमीटर अंतरावर गेली आहे. त्यामुळे दर्शनासाठी पाच ते सहा तासांचा कालावधी लागत आहे.

याकाळात अधिकाधिक भाविकांना विठुरायाचे सुलभ दर्शन घेता यावेसाठी दर्शनाची सुमारे दीड ते दोन तासांनी वेळ वाढविण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.‌

असा आहे देवाचा नित्योपचार

अधिक मासाच्या निमित्ताने पहाटे चार वाजता मंदिर उघडले जाते. पहाटे चार ते सव्वा चार काकड आरती, पहाटे 4.15 ते 5.15 नित्य पूजा, सकाळी 10.45 ते 11 महानैवद्य, दुपारी 4.30 ते 5 पोषाख, सायंकाळी 6.45 ते 7 धुपारती,रात्री 12 नंतर शेजारती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

SCROLL FOR NEXT