Accident: बस आणि कंटेनरच्या भीषण अपघात; बस चालक जागीच ठार अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

Accident: बस आणि कंटेनरच्या भीषण अपघात; बस चालक जागीच ठार

या अपघातामध्ये निकम यांना ऐन दिवाळीच्या सणात आपला जीव गमवावा लागला आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : लासलगाव आगाराची लासलगाव ते तुळजापूर MH-14- 3641 ही बस सकाळी आगारात प्रवेश करत असताना कंटेनर नंबर MH-Y- 4763 ने जोरात धक्का दिल्याने बसचा चालक एस. पी. निकम यांनी खाली उतरून पाहणी करत असताना चालकाला कंटेनरने फरफटत नेल्याने मृतदेहाचे तुकडे- तुकडे झाले आहेत. या अपघातामध्ये निकम यांना नाहक ऐन दिवाळीच्या सणात आपला जीव गमवावा लागला आहे.

हे देखील पहा-

यामुळे संतप्त बसचालक आणि वाहक तसेच बस आगारातील कर्मचारी संतप्त झाले आणि बस सेवा बंद केली आहे. नाशिक येथून बसचालक एस. पी.निकम हे लासलगाव या ठिकाणी आले. सकाळी बस स्थानकावर चालक एस. पी.निकम यांनी आगाराचे व्यवस्थापक समर्थ शेळके आणि राजेंद्र दारके याच्या बरोबर चहा घेतला व आगारातून बस स्थानकात रस्त्याने आत घेत असताना बसला कटेंनरने धक्का दिला व अपघात झाला आहे.

हा कंटेनर चालक भरधाव वेगाने बस स्थानक ते गुंजाळ पेट्रोलपंपासमोर असलेल्या अमित नंदकुमार बिरार आणि सलिमभाई कलर वाले यांचे दुकानांना धडका देत व एका स्कूटीला धडक देत हा कंटेनर थांबला. या अपघातात चालक निकम यांचे मृतदेहाचा रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडाच पडला होता. ही घटना समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे कर्मचारीसह घटना स्थळी दाखल झाले होते. निकम यांच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या बस चालक वाहकांच्या संप सुरू आहे. परंतु, काल बससेवा सुरू झाली. आज बस कर्मचारी परत संपाचे मानसिकतेमध्ये होते. परंतु, दिवाळीमुळे बस सुरू करतात अशी विनंती करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि बस आगार प्रमुख समर्थ शेळके यांच्यात चर्चा झाली. त्यानुसार सकाळी ६ वाजेपासून बसेस सुरू करण्यात आली आहे, आणि ही दुर्घटना घडली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Traffic Alert : ठाणे - घोडबंदर मार्ग पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

Maharashtra Live News Update: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

SCROLL FOR NEXT