Sakshi Sunil Jadhav
फ्रेंडशिप डे म्हणजे कोणताही स्वार्थ मनात न ठेवता जपलेल्या नात्याचा महोत्सव करण्याची संधी देणारा दिवस असतो.
दरवर्षी फ्रेंडशीप डे शाळा, कॉलेज, ऑफीस अशा सगळ्याच ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
इतकंच नाहीतर भारतासह बांगलादेश, मलेशिया, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशात फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.
यंदा फ्रेंडशिप डे ३ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे.
फ्रेंडशिप डे हा फक्त मैत्रीचा दिवस म्हणून नाहीतर दुरावलेले मित्र पुन्हा जोडण्यासाठी साजरा केला जातो.
फ्रेंडशिप डेच्या वेगवेगळ्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात असे आढळते की ऑगस्टच्या पहिल्या रविवारी हा सण साजरा केला जातो.
१९३५ मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकेत एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. जेव्हा त्याच्या मित्राला हे कळले तेव्हा त्याच्या मित्राने आत्महत्या केली होती.
मैत्रीचे हे उदाहरण पाहून अमेरिकन सरकारने ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करायचे ठरवले. पुढे इतर देशांनी सुद्धा हा दिवस साजरा करण्याचे आदेश दिले.
NEXT : नागपूरच्या अशा Top 8 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी