Dhanshri Shintre
केंद्र सरकारने अलीकडेच कठोर पाऊल उचलत 25 ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लील कंटेंट प्रसारित केल्यामुळे बंदी घातली आहे.
सरकारनुसार, या बंदीचा उद्देश म्हणजे अश्लील कंटेंटपासून लहान मुले व तरुणांचे संरक्षण आणि डिजिटल माध्यमांवर कायदेशीर, नैतिक सामग्री सुनिश्चित करणे होय.
मात्र प्रश्न असा उभा राहतो की, बंदी लागू झाल्यानंतर हे ओटीटी प्लॅटफॉर्म त्वरित बंद होतात का, की काही प्रक्रिया लागते?
बंद करण्यात आलेल्या अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सना गुगल प्ले स्टोअरवर 1 कोटी ते 50 लाखांहून अधिक डाऊनलोड्स मिळाले होते, हे विशेष लक्षवेधी आहे.
हे ओटीटी प्लॅटफॉर्म सोशल मीडियावर ट्रेलर, लहान व्हिडिओ क्लिप्स आणि लिंक्स शेअर करून यूजर्सपर्यंत सहज पोहोचत होते.
वेबसाइट किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यानंतर ते त्वरित बंद होत नाहीत, त्यासाठी काही तांत्रिक प्रक्रिया आणि वेळ लागतो.
बंदी लागू होण्यासाठी लागणारा वेळ वेबसाइटच्या स्वरूपावर, बंदीच्या कारणावर आणि त्या वेबसाइटचे व्यवस्थापक काय उपाय करतात यावर अवलंबून असतो.
काही वेळेस वेबसाइट्स तात्काळ बंद होतात, तर काही प्रकरणांमध्ये त्यासाठी काही तासांपासून काही दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.