BitChatApp: व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी आला नवीन अ‍ॅप, हा मेसेजिंग अ‍ॅप इंटरनेटशिवाय करेल काम

Dhanshri Shintre

मेसेजिंग अ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅपसाठी स्पर्धक म्हणून बिटचॅट नावाचं नवीन मेसेजिंग अ‍ॅप बाजारात आलं आहे.

डाउनलोडसाठी उपलब्ध

ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी सांगितलं की बिटचॅट अ‍ॅप स्टोअरवर आता डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.

बिटचॅट अ‍ॅप

बिटचॅट अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध असून, त्यात यूजर्सच्या प्रायव्हसीसाठी मजबूत सुरक्षा व्यवस्था आहे.

इंटरनेटशिवायही संवाद

अ‍ॅप स्टोअरवरील स्क्रीनशॉटमध्ये बिटचॅटच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख असून, हे इंटरनेटशिवायही संवाद साधण्यास सक्षम आहे.

ब्लूटूथ लो एनर्जी तंत्रज्ञान

अ‍ॅप स्टोअरवरील स्क्रीनशॉटनुसार बिटचॅट संवादासाठी ब्लूटूथ लो एनर्जी तंत्रज्ञानाचा वापर करते, इंटरनेटशिवाय संवाद शक्य.

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन

हे अ‍ॅप एंड-टू-एंड एन्क्रिप्शन देते, ज्यामुळे तुमचे संदेश सुरक्षित राहतात आणि हॅक होण्याचा धोका नाही.

मेंशन करण्याची सुविधा

बिटचॅटमध्ये यूजर्सना @Mention सुविधा आणि आवडत्या व्यक्तींसाठी खास पर्याय देखील दिला आहे.

डेटा डिलीट

बिटचॅटमध्ये पॅनिक मोड आहे, ज्यात लोगोवर तीन वेळा क्लिक केल्यास सर्व डेटा त्वरित मिटवला जातो.

NEXT: WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

येथे क्लिक करा