चवदार तळ्यात साचलेली घाण काढताना महाड पालिकेचे कर्मचारी. 
महाराष्ट्र

या कारणाने ऐतिहासिक चवदार तळे झाले विद्रूप!

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

राजेश भोस्तेकर

रायगड ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांना मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी मोठा लढा उभारला होता. कोकणातील महाडच्या चवदार तळ्यावरील पाण्यासाठी केलेला सत्याग्रह इतिहासात अजरामर आहे. सरकारने या तलावाला राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर केले आहे. परंतु या तळ्यावरील पाण्यापासून लोकांना आताही दुरापास्त रहावे लागत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी चवदार तळ्यावर सत्याग्रह करून अस्पृश्यता मिटवली होती. चवदार तळे हे सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानले जाते. पर्यटक तसेच आंबेडकर प्रेमी मोठ्या प्रमाणात या तळ्यावर येत असतात. परंतु या तळ्याचा चेहरा मोहराच बदलला आहे.Dirt accumulated in the historic lake

महाडमधील ऐतिहासिक चवदार तळ्यामध्ये महापुरादरम्यान पुराचे पाणी शिरले होते. या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात घाण आणि केरकचरा चवदार तळ्यात शिरला होता. पाणी ओसरल्यानंतर चवदार तळ्यावरील चित्र विदृप दिसत होते.  महाड नगर पालिकेने होडीच्या साहाय्याने कर्मचाऱ्यांच्या मदतीने चवदार तळ्याच्या पाण्यावरील कचरा साफ केला. मात्र, अद्यापि तळ्यात मोठ्या प्रमाणात तळाशी गाळ असल्याने हा गाळ काढण्याचे काम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे, असे महाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात 22 जुलै रोजी आलेल्या महापुराने चवदार तळेही पुराच्या पाण्याने ओसंडून वाहू लागले. पूर ओसरल्यानंतर चवदार तळ्यात घाणीचे साम्राज्य पसरले. महाड नगर परिषदेने चवदार तळे स्वच्छता मोहीम हाती घेऊन पाण्यावर साचलेला कचरा काढून स्वच्छ केले. मात्र, माती मिश्रित लाल पाणी अजून तसेच आहे. तळाला मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे पूर्ण तळ्यातील पाणी उपसा करून गाळ काढला जाणार आहे. शासनाकडून शहरातील स्वच्छतेसाठी विशेष एक कोटी निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून चवदार तळ्याची स्वच्छता केली जाणार आहे. Dirt accumulated in the historic lake

चवदार तळ्यातील पाणी हे सध्या पिण्यायोग्य नसल्याने पूर्ण पाणी उपसून गाळ काढला जाणार आहे. यासाठी डिझेल व विद्युत पंप, 2 पोकलन, 2 छोटे पोकलन, 6 डंपर अशी यंत्रणा वापरली जाणार आहे. चवदार तळे हे राष्ट्रीय स्मारक असल्याने महाड नगर परिषदेतर्फे पावले उचलली जात आहेत.

- जीवन पाटील, मुख्याधिकारी, महाड नगर पालिका.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT