Chhatrapati Sambhaji Nagar Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar: एमआयडीसीच्या अक्षम्य चुकीचा भुर्दंड राज्यभरातील उद्योजकांना पडणार; नेमकं करण काय?

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhaji Nagar News: सहा वर्षांपासूनचा जीएसटी व्याजासह भरा अशा नोटिसा एमआयडीसीने उद्योजकांना दिल्यानं औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एमआयडीसीच्या अक्षम्य चुकीचा भुर्दंड राज्यभरातील उद्योजकांना पडणार आहे. एमआयडीसीच्या या चुकीमुळे राज्यातील ५७ हजार २४ उद्योगांना १ जुलै २०१७ ते ४ सप्टेबर २०२२ दरम्यान ५ वर्षांतील अतिरिक्त जीएसटी एकरकमी व्याजासह भरावा लागेल. (Latest Marathi News)

विशेष म्हणजे चालू वर्षांच्या पाणी कराच्या बिलासोबत तो आकारण्यात आल्याने एमआयडीसीच्या (MIDC) प्लॉट्सवर भाडेकराराने उद्योग करणाऱ्यांना मोठा भुर्दंड बसणार आहे. केंद्रीय जीएडीच्या इंटेलिजन्स पथकाच्या मुंबई (Mumbai) झोनच्या पथकाने नोव्हेंबर २०२२ रोजी केलेल्या पाहणीत ही त्रुटी आढळून आली होती.

त्यानंतर उद्योजकांना हा अतिरिक्त जीएसटी (GST) व्याजासह भरण्याचे आदेश देण्यात आले. एमआयडीसीने आता त्यांच्या वसाहतीत भाडेपट्ट्यावर असलेल्या उद्योगांकडून ही वसुली सुरू केली. विशेष म्हणजे या वसुलीत ना हप्ते पाडून देण्यात आले ना उद्योजकांना पुढे दाद मागण्यासाठी सवलत दिली.

१ जुलै २०१७ ते ४ सप्टेंबर २०२२ या कालावधीत घेतलेल्या विविध सेवांवरील जीएसटी विलंब शुल्कासह भरण्याच्या नोटिसा एमआयडीसीने उद्योजकांना पाठवल्या आहेत. एमआयडीसीने जेव्हाच्या तेव्हा जीएसटीची वसुली केली नाही, यामुळे मागील सहा वर्षांचा जीएसटी व्याजासह भरावा लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख, जाणून घ्या;सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT