Beed Murder Case google
महाराष्ट्र

Beed: मस्साजोग खून प्रकरणी वातावरण तापलं, भाजप- ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप

Beed Murder Case: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामुळे बीडचं वातावरण खूप तापलं आहे. चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा अशी अंबादास दानवे यांची मागणी आहे.

Dhanshri Shintre

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी. यात कुणीही राजकारण करू नये. तसेच, बीड मतदारसंघातील पवनचक्की प्रकरणी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचीही चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

या दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचे मूळ कारण पवनचक्की ठरली. याप्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांनी राजकारण करू नये. आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी आपली स्पष्ट भूमिका आहे. मागील काही दिवसांपासून बीड मतदारसंघात पवनचक्की कंपन्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे, यात स्थानिक आमदारांचे आर्थिक हितसंबंध देखील आहेत.

त्यांच्या वरदहस्तामुळे अनेक शेतकऱ्यांना त्रास होत आहे. याबाबत आपण अनेकदा आवाज उठविलेला असून बीडच्या आमदारांसह पवनचक्की कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्याची गरज आहे. या साखळीमुळे बीड मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या, पिकांची हानी केली, मोबदला देण्यास टाळाटाळ होत असून शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. मस्साजोगसारखी अप्रिय घटना टाळण्यासाठी शासनाने बीडच्या आमदारांसह मतदारसंघातील पवनचक्की कंपन्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करून दोषीविरोधात कारवाई करावी, अशी मागणी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केली आहे.

मस्साजोग खून प्रकरण संदीप क्षीरसागर बाईट पॉईंट्स

- या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, अन्यथा अधिवेशनात लक्षवेधी मांडणार

- आज लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे लोक रस्त्यावर उतरत आहेत

- या गुन्हेगारीमधील मास्टरमाइंड जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत लोक रस्त्यावर उतरतील

- मी ज्यावेळी देशमुख कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेलो, त्यावेळी त्या ठिकाणच्या लोकांनी वाल्मीक कराडांचे नाव घेतले ही खोटी गोष्ट नाही, जिल्ह्यात कोणालाही विचारलं तर ही वस्तुस्थिती आहे

- मनोज जरांगे आणि लोक त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले

- पाटोदा येथील बांगर कुटुंबावर देखील अन्याय झाला हा गंभीर विषय आहे

- लहानसहान व्यापारी सुद्धा दहशतीत आहे

- प्रशासनाने लपवाछपवीचा डाव खेळू नये यामागील मास्टरमाईंड नक्की समोर येईल

- केवळ दोन-तीन माणसांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होतो आहे, या प्रकरणात खोलात तपास केला पाहिजे, ही लोक आत टाकली तर परिस्थिती सुधारेल

- वातावरण खराब करण्याचे काम काही लोक करत आहेत त्याची चौकशी झालीच पाहिजे

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची भेट

राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची भेट घेतली आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करा, त्याचबरोबर ज्यांनी कोणी यांना पाठबळ दिले आहे, त्याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT