Nandurbar News Saamtv
महाराष्ट्र

Nandurbar News: न्यायालयासमोर सिने स्टाईल थरार! पोलिसांना चकवा देत आरोपी चारचाकीमधून फरार; नंदूरबारमध्ये खळबळ

Nandurbar News Update: हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Gangappa Pujari

सागर निकवाडे, प्रतिनिधी...

Nandurbar News: एखाद्या मोठ्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना चकवा देवून फरार झाल्याचे किंवा त्याच्या साथीदारांनी त्याला पोलिस स्टेशनमधून पळवून नेल्याच्या कथा अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये पाहिल्या असतील. पण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा न्यायालयात ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा न्यायालयातुन (Shahada Court) एक आरोपी फरार झाल्याची घटना घडली समोर आली आहे. शहादा न्यायालयात एका आरोपीला दुपारच्या सत्रात हजर करण्यात आले असता आरोपी पोलिसांना चकवा देत न्यायालया समोर आधीच येवून उभ्या असलेल्या कारमध्ये बसून फरार झाला. क्षणात झालेल्या या प्रकाराने पोलिसही चक्रावून गेले. या प्रकारानंतर न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

न्यायालयातून भरधाव निघालेल्या कारने डोंगरगाव परिसरात एका मोटरसायकल स्वारालाही रस्त्यात उडवले. या अपघातात (Accident ) तरुण जखमी झाला असून त्याला शहादा रुग्णालयात दाखल करण्यात आलेआहे. पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केला परंतु तो काही त्यांच्या हाती लागला नाही. त्यामुळे पोलिसांच्या तावडीतून निसटण्यास आरोपी यशस्वी झाला. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा हा प्रकार असून हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT