धक्कादायक : चारित्र्याच्या संशयावरून 74 वर्षीय पतीने बायकोला पेटवलं Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक : चारित्र्याच्या संशयावरून 74 वर्षीय पतीने बायकोला पेटवलं

पत्नी पहाटेच्या सुमारास सरपण गोळा करण्यासाठी गेली होती, सरपण घेऊन परत आल्यावर पती गंगाराम याने तिला बेदम मारहाण करत वाद उकरून काढला.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेणाऱ्या वृध्द पतीने आपल्या पत्नीला पेटविल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घडली आहे. या घटनेने समाजमन सून्न झाले आहे. मुक्ताबाई गंगाराम शेंडे (65) असे मृत महीलेचं नाव आहे.

आरोपी पती गंगाराम  शेंडे ( 74 ) याला पोलीसांनी अटक केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) मूल तालुक्यात येणाऱ्या सुशी गावातील मुक्ताबाई गंगाराम शेंडे या पहाटेच्या सुमारास सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सरपण घेऊन परत आल्यावर पती गंगाराम याने तिला बेदम मारहाण करत वाद उकरून काढला. रागाच्या भरात त्याने पत्नीच्या अंगावर डिझेल ओतले आणि पेटवले.

मुक्ताबाईच्या किंकाळ्या ऐकून गावकरी धावून गेलेत. जळलेल्या स्थितीत मुक्ताबाईला चंद्रपूरला उपचारासाठी हलविण्यात आले. चंद्रपुरात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नागपुरला नेण्यात आले. मात्र मार्गात मुक्ताबाईने प्राण सोडला. गंगाराम हा नेहमी मुक्ताबाईच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. संशयातून ही भयंकर घटना घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पोलीसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास मुल पोलीस करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dr Ambedkar Favourite Cafe: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबईतला आवडता कॅफे कोणता होता?

मुंबईत १४ लाख बोगस मतदार? आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप|VIDEO

Maharashtra Nagar Parishad Live : नागपुरात लग्नसोहळा पार पडताच नवरीने केले मतदान

Maharashtra Live News Update: लोकसभेत 8 डिसेंबर रोजी वंदे मातरमच्या 150 व्या वर्षावर आणि 9 डिसेंबर रोजी निवडणूक सुधारणांवर चर्चा होणार

क्रीडा विश्वाला मोठा धक्का; माजी दिग्गज क्रिकेटपटूने घेतला जगाचा निरोप

SCROLL FOR NEXT