Thane Water Supply Saam tv
महाराष्ट्र

Thane Water Supply : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; मुंबई महापालिकेकडून शहरात १० टक्के पाणी कपात

Thane News : मुंबई महापालिकेच्या पिसे, पांजरापूर विद्युत केद्रात वीज मीटर्स अद्यावतीकरणाचे काम हाती घेण्यात येत आहे. यामुळे वीज पुरवठा बंद राहणार असल्याने ठाणे शहरातील काही भागात पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात

विकास काटे, ठाणे

ठाणे : ऐन पावसाळ्याच्या दिवसात ठाणे शहरात पाणी कपात करावी लागत आहे. मुंबई महापालिकेच्या पिसे, पांजरापूर येथील विद्युत केद्रात वीज मीटर्स अद्यावतीकरणाचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात लागू झाल्याने मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा होणाऱ्या ठाणे शहरातील काही भागात ७ ते ९ ऑक्टोबर या काळात १० टक्के पाणी कपात लागू होणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात विविध स्रोतांमधून पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी ८५ एमएलडी पाणी हे मुंबई महापालिकेच्या स्रोतांतून ठाण्याला मिळते. दरम्यान यंदा चांगला पाऊस झाला असून धरण, तलावात मुबलक असा पाणीसाठा आहे. यामुळे पाणी टंचाई यंदाच्या वर्षात लवकर जाणविणार नसल्याचे चित्र आहे. मात्र यापूर्वीच ठाणे शहरात तांत्रिक कारणामुळे पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. 

१० टक्के पाणी कपात 

मुंबई महापालिकेच्या स्रोतातून ठाण्याला पाणी पुरवठा केला जात असतो. मात्र मुंबई महापालिकेच्या पिसे, पांजरापूर येथील विद्युत केद्रात वीज मीटर्स अद्यावतीकरणाचे काम हाती घेण्यात येत आहे. यामुळे वीज पुरवठा बंद राहणार असल्याने ठाणे शहरातील काही भागात तीन दिवस पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात राहणार आहे. ७ ते ९ ऑक्टोबर, २०२५ या काळात १० टक्के पाणी कपात लागू होणार आहे.

या भागात होणार पाणी कपात 

पाणी साठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथनगर, रामचंद्र नगर १, किसन नगर नं १, किसन नगर नं २, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नं १, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी कन्हैया नगर या परिसरात पाणी कपात राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे-सातारा महामार्गावर कंटेनर पलटी होऊन अपघात

HSC SSC Result 2026 : दहावी-बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख आली समोर, आताच करा नोट

Crime news India: बाप की सैतान! पोटच्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केली हत्या, पोलिसांकडून पित्याला अटक

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार? 'हा' नाही 'ही' स्पर्धक मारणार बाजी

Iran vs US War: कोणतीच तारीख निश्चित नाही, अमेरिका विश्वासघातकी; चर्चेच्या दुसऱ्या फेरीदरम्यान इराणचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT