Dombivali : रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वार कमानीवरून डोंबिवली नावच गायब; उबाठाकडून आंदोलनाचा इशारा

Dombivali News : रेल्वे स्टेशन परिसरात उभारण्यात आलेल्या ८ प्रवेशद्वारांवर डोंबिवलीला उपमा देण्यात आलेली नवे झळकत आहेत. पण डोंबिवली नावाचा उल्लेख कोणत्याच कमानीवर पाहण्यास मिळत नाही.
Dombivali News
Dombivali NewsSaam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे

डोंबिवली : गेल्या वर्षभरापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे कोट्यवधी रुपयांचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. स्टेशनला एक नवा चेहरा मिळत आहे. मात्र रेल्वे स्थानकाच्या कमानीवरून डोंबिवली नावच गायब झाले आहे. दरम्यान ठळक अक्षरात असलेले डोंबिवली नाव न दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा उबाठा कडून देण्यात आला आहे. 

डोंबिवली रेल्वे स्थानकाचे गेल्या वर्षभरापासून कोट्यवधी रुपयांचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. अर्थात स्टेशनला एक नवा चेहरा मिळत आहे. याठिकाणी वाढीव जिने, सरकते जिने, शेड्स उभारले जात आहेत. पण हे सुशोभीकरण इतके प्रभावी ठरले आहे की, खुद्द 'डोंबिवली' हे मूळ नावच स्थानकाच्या प्रवेशद्वारांच्या कमानी वरून गायब झाले आहे. यावरून शिवसेना उबाठाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.  

Dombivali News
Gadchiroli : पुष्पा स्टाईलने सागवान तस्करी; तेलंगणात वाहतूक केली जात असताना कारवाई

कोणत्याच कमानीवर नावाचा उल्लेख नाही 

डोंबिवलीला मिळालेल्या उपमा, जसे की नाट्यनगरी, क्रिडानगरी, साहित्यनगरी या नावांच्या कमानी सर्व ८ प्रवेशद्वारांवर झळकत आहेत. पण डोंबिवली नावाचा स्टेशन परिसरातील कोणत्याच कमानीवर कोठेच उल्लेख पाहण्यास मिळत नाही. यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना आपण नक्की कोणत्या स्टेशनवर आहोत? याचा मोठा गोंधळ होत आहे. 

Dombivali News
Nandurbar : विद्यार्थ्यांचा 'पायी पायी पाढे’ उपक्रम; जंगलातून चार किमीचा प्रवास करत प्राण्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न

उबाठाचा आंदोलनाचा इशारा 

या गंभीर प्रकारानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमोद गोपीनाथ कांबळे यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन देत मूळ नाव ठळक अक्षरात त्वरित लावावे आणि रेंगाळलेली कामे पूर्ण करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तर डोंबिवली हे मूळ नावच कुठेच दिसत नसल्याने स्थानकाचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण करताना रेल्वे प्रशासनानं जणू ओळखच मिटवली आहे. असे वाटत आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com