गणेश शिंगाडे
गडचिरोली : पुष्पा सिनेमातील चंदन तस्करी कशा पद्धतीने केली जाते याची स्टोरी सर्वांनीच बघितली आहे. कधी दुधाचा टँकरमधून तर कधी नदी- नाल्याच्या पात्रातून सर्रासपणे वन विभाग आणि पोलिस विभागाच्या डोळ्यात धुळ फेकत चंदन तस्करी केली जाते. त्या सिनेमाला साजेशी अशीच सागवान लाकडाची तस्करी केली जात असल्याचे उघड झाले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलातून सागवान तेलंगाणा राज्यात तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने वनविभागाचा कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग हे मौल्यवान सागवानासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र, तेलंगाना आणि छत्तीसगड या तीन राज्यांची सीमा असलेल्या या वन विभागातील मौल्यवान सागवान जंगलावर परराज्याची विशेषतः तेलंगणा आणि छत्तीसगड राज्याची वक्रदृष्टी पडली आहे. त्यामुळे येथे मागील अनेक वर्षापासून सागवान तस्करी सुरूच आहे. चोरून लपून सागवान लाकडाची वाहतूक केली जात आहे.
पुष्प स्टाईलने लाकडांची वाहतूक
दरम्यान १ ऑक्टोबरला सिरोंचा तालुका मुख्यालय जवळील चिंतलपल्ली येथे वन विभागाने रात्रीच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात सागवान लाकडे जप्त केली आहेत. विशेष म्हणजे मालवाहू पिकअप गाडीला खालून पत्रा ठोकून त्यात कप्पा बनवून हि वाहतूक केली जात होती. मात्र वन विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत सागवान लाकूड जप्त करण्यात आले आहे.
मात्र नेमकं ती चारचाकी वाहन कुणाची आहे? मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी कुठे केली जात होती? चौकशीत काय निष्पन्न झाला? चार दिवस उलटूनही सिरोंचा वनविभागाने अजूनपर्यंत या कारवाईची माहिती प्रसार माध्यमांना दिली नाही. वन विभागाची कारवाई सुरु असली तरी या कारवाई वरून सिरोंचा तालुक्यात मौल्यवान सागवान लाकडांची तस्करी सुरूच असल्याचे पुन्हा एकदा निष्पन्न झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.