Jitendra Awhad Saam tv
महाराष्ट्र

Jitendra Awhad : राज्यात महाविकास आघाडीच सरकार येईल; जितेंद्र आव्हाड यांचा विश्वास

Thane News : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोल मांडले जात आहेत. यावर बोलताना आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

ठाणे : ज्या शरद पवारांनी बारामती घडवली. त्यांच्या पत्नीला दारा बाहेर थांबवणं. आतमध्ये न जाऊ दे न हे कुठल्या कायद्याखाली बसत हे माणुसकीच्या कायद्याखाली देखील बसत नाही. इतकेच नाही तर अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक करुन त्यांचं डोकं फोडण, जागोजागी पैसे नेणं, विनोद तावडे सारख्या मोठ्या नेत्याच्या आजूबाजूला पाच कोटी मिळतात; हे महाराष्ट्राच्या जनतेला रुचणार नाही. यामुळे परिवर्तन होणार महाविकास आघाडी सत्तेत येणार; असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. 

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोल मांडले जात आहेत. यावर बोलताना आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, कि माणुसकी नसलेली माणसं आता राजकारणात आली. सर्व भागातले आमदार येतील त्यांची संख्या १६० च्या वर असेल; असे देखील त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री होण्याची प्रत्येकाला हौस 
मुख्यमंत्री मी असणार, प्रत्येकाला हौस असते. तेवढाच बोलण्याचा पाच मिनिटांचा आनंदा असतो तोही तुम्ही हिराहून घेता. काहीजणांना आवडतं हे सगळं बोलायला. मी मुख्यमंत्री होणार बोलल्यावर मला सुद्धा आनंद वाटतो. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस काय होणार याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आमचा मुख्यमंत्री होतोय हे म्हटल्यावर आम्ही कशाला त्यांचं बघायला जाऊ

वाढलेली टक्केवारी हे सत्तेच्या विरोधात 
मतांची वाढलेली टक्केवारी ही नेहमीच सत्तेच्या विरोधात असते. सत्तेवर राग असतो. म्हणून लोक बाहेर पडून भरभरून मतदान करतात. लाडकी बहीण योजना चांगली आहे. पण वाढलेले भाव आणि महागाई हे देखील बहिणींच्या लक्षात आले आहे. आम्ही महालक्ष्मी योजना काढली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात की माझीच लाडकी बहीण यात लफडं झालं. दीड हजार रुपये दिले, म्हणजे प्रत्येकाने पाचशे पाचशे रुपये दिले की तिघांनी वाटून घेतले. आता पैसे वाढवून देणार कारण त्यांच्या बहिणी वाढल्या. बहिणींवरून आता त्यांच्या स्पर्धा लागल्याचे ते म्हणाले. 

भाजपचा काही प्लॅन असणार 

एकनाथ शिंदे यांना काढूनच टाकणार असतील तर आपल्याला वाईट वाटेल. भले त्यांनी मला मदत नाही केली. त्यांनी मला पाडायचा प्रयत्न केला, तरी आपला मुख्यमंत्री आपल्या बाजूलाच राहतो हे बरं वाटतं. बाकीचं वैर सोडून द्या, मुख्यमंत्री माझ्या घराच्या बाजूला राहतो ही सन्मानाची आणि मानाची बाजू आहे. बीजेपी उघडपणे म्हणत असतील की मुख्यमंत्री होऊनच देणार नाही याचा अर्थ भाजपचा कुठेतरी प्लान झाला असेल; असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT