Thane News Saam tv
महाराष्ट्र

Firecrackers Godown Blast : फटाक्याच्या गोडाऊनमध्ये स्फोट; एकाचा मृत्यू, एक जण जखमी

Thane News : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील शिंदीपाडा कोलठण गाव शिवारात फटाके बनविण्याचे गोडाऊन आहेत.

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

मुरबाड : फटाके बनविण्याच्या कामाला सध्या गती मिळाली आहे. या दरम्यान  मुरबाड तालुक्यातील शिंदिपाडा कोलठण गावाच्या परिसरात असलेल्या फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण स्फोट झाला. यात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. 

ठाणे (Thane) जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील शिंदीपाडा कोलठण गाव शिवारात फटाके बनविण्याचे गोडाऊन आहेत. या गोडाऊनमध्ये कामगार फटाक्यांची उचलठेव करीत असतांना असेच फटाक्यांचे बाॅक्स हालवत असताना अचानक भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता कि सगळीकडे धुराचे लोळ पसरले व मोठा आवाज झाला. या स्फोटात गोडाऊन मालकाच्या मुलगा मनीष याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य एक जण जखमी झाले असल्याचे समजत आहे. 

गोडाऊनमध्ये झालेल्या भीषण स्फोटाची माहिती मिळताच मुरबाड पोलीस व तहसीलदार यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. तपास सुरू केले आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फटाक्यांचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये किती क्षमतेची साठवणूक करण्यासाठी परवानगी दिली गेली आहे.‌ तसेच दर वर्षी याची चौकशी केली जाते कि नाही? या फटाके गोडाऊन मालकानी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून काय पर्याय व्यवस्था केली आहे. गोडाऊनपासून वन विभागाचे जंगलात किती अंतरावर आहेत. याची चौकशी करणे गरजे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT