Ganesh Naik addressing the public in Thane, taking a strong stand against Eknath Shinde ahead of municipal elections. Saam Tv
महाराष्ट्र

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

BJP vs Shinde Sena Conflict In Thane: महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाण्यात भाजप विरुद्ध शिंदेसेनेत संघर्षाची ठिणगी पडलीय.. नाईकांनी थेट शिंदेंवर हल्लाबोल केलाय.. मात्र गणेश नाईक एकनाथ शिंदेंविरोधात एवढे आक्रमक का झालेत? शिंदेंना घेरण्यामागची भाजपची रणनीती नेमकी काय आहे?

Omkar Sonawane

आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाणे जिल्ह्यात मंत्री गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष विकोपाला गेलाय. नवी मुंबई महापालिकेत 14 गावं समावेश करण्याचा वाद आता लायकीवर आलाय.. गणेश नाईकांनी 14 गावांच्या समावेशाला विरोध करतानाच नालायकांच्या हाती सत्ता देऊ नका म्हणत एकनाथ शिंदेंना डिवचलंय.. तर त्याला शिंदेसेनेनंही जशास तसं उत्तर दिलंय...

खरंतर गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष जुना आहे. त्याला नवी फोडणी मिळालीय ती नवी मुंबईत 14 गावांचा समावेश करण्यावरुन... मात्र हा वाद नेमका काय आहे?श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघातील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय शिंदेंनी घेतलाय.. या निर्णयाला गणेश नाईकांनी प्रखर विरोध केलाय.. 14 गावांचा समावेश केल्यास महापालिकेवर आर्थिक भार वाढेल, असा नाईकांचा दावा आहे. त्यामुळे नाईकांनी शिंदेंच्या निर्णयावर स्थगिती आणण्याची मागणी केलीय..

गणेश नाईकांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर भाजपनं नाईकांना पालघरचं पालकमंत्रिपद दिलं. तर नाईकांनी शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी आणि शिंदेंना अस्थिर करण्यासाठी थेट जनता दरबार घेण्यास सुरुवात केलीय... एवढंच नाही तर नाईकांनी ठाणे जिंकण्याचा निर्धारही व्यक्त केलाय...

मंत्रिमंडळात शिंदेसेना विरुद्ध भाजप असं कुरघोडीचं राजकारण सुरु असल्याची चर्चा आहे... त्यातच आता गणेश नाईकांनी नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात शिंदेंची कोंडी करायला आणि शिंदेंवर टीका करायला सुरुवात केलीय... त्यामुळे ठाण्यात शिंदेंची कोंडी करत त्यांना ठाण्यापुरतच मर्यादीत ठेवून राज्यभर आपला प्रभाव वाढवण्यासाठी ही भाजपची रणनीती आहे का? असाही प्रश्न विचारला जातोय.. मात्र ठाणे जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिंदेसेना संघर्ष वाढत गेल्यास त्याचा फटका महायुतीलाच बसण्याची शक्यता अधिक आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

Baba Vanga Prediction: दोन महिन्यात भारतात महापूर,भूस्खलन व तापमान वाढ; कोणी दिला इशारा?

SCROLL FOR NEXT