Bhiwandi Police Saam tv
महाराष्ट्र

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Bhiwandi News : घराच्या पडवीमध्ये ७४ किलो ५४८ ग्रॅम वजनाचा ३७ लाख ३७ हजार ४०० रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विकास काटे, ठाणे

भिवंडी (ठाणे) : प्रतिबंधित असलेला गांजा विक्री सर्रासपणे सुरु आहे. अशाच प्रकारे गांजा विक्री साठी आलेल्या तिन जणांना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ३७ लाखाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा कोठून आला याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. 

भिवंडी शहरात तीन जण गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती भिवंडीचे गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना गुप्त बातमीदारतर्फे मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने जनार्दन सोनवणे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार आणि पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. यानंतर तिघे आल्यानंतर त्यांना पथकाने ताब्यात घेतले आहे. 

तिघांना ताब्यात घेत ७४ किलो गांजा जप्त 

पोलिसांच्या पथकाने फैसल अकबर अन्सारी (वय ४४), अब्दुल रहमान मुजाहीद अन्सारी (वय २०) व अन्वर जमीलूद्दीन अन्सारी यांना ताब्यात घेतले. यातील पहिल्या दोघांच्या आणि तिसऱ्या इसमाच्या राहत्या घराच्या पडवीमध्ये ७४ किलो ५४८ ग्रॅम वजनाचा ३७ लाख ३७ हजार ४०० रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी करीत आहे.

घरफोडी करणारी टोळी जेरबंद 

नागपूरमध्ये घरफोडी करणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून ७ घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. यात तिघांना अटक करत ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. नागपूरच्या पारडी पोलिस ठाण्यातील पथकाचे कारवाई केली असून घरफोडी प्रकरणात संदीप टेंभरे, महेंद्र कुशवाह आणि राजेंद्र मालवी अशी अटकेतील आरोपीचे नाव आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT