Uddhav Thackeray and Raj Thackeray during discussions over the proposed 72-seat sharing formula for the Mumbai civic polls. Saam Tv
महाराष्ट्र

ठाकरेसेनेचा 72 जागांचा प्रस्ताव मनसे स्वीकारणार? 36 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 2 जागा?

Thackeray–MNS Alliance: ठाकरे सेना आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली नसली तर जागा वाटपाबाबत जोरदार खलबतं सुरु आहेत. ठाकरेसेनेनं मनसेसमोर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठेवलाय. हा फॉर्म्युला नेमका काय आहे आणि तो मनसे स्वीकारणार का?

Girish Nikam

उद्धव आणि राज यांचं मनोमिलन होऊन गेल्या काही महिन्यात अनेकदा गाठीभेटी झाल्यात. मात्र अद्याप ठाकरे सेना आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली नाही. असं असलं तरी दोन्ही पक्षातील जागावाटपाची चर्चा ठोस आकड्यांवर आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मातोश्री आणि कृष्णकुंज इथं बैठकांना जोर आला आहे. राज्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडाला असताना मुंबईतही ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाची समिकरणं जुळवली जात आहेत. ठाकरे बंधूंमध्ये कोणत्या फॉम्यूर्लावर चर्चा झाली आहे.

मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रस्ताव

म्हणजेच 227 पैकी 72-75 जागा मनसेला देण्यास तयार

ठाकरेसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फॉर्म्युल्यावर प्राथमिक सहमती

मनसेकडून मात्र मराठी पट्ट्यात अधिक जागांसाठी आग्रह

मनसेचा प्रभाव असलेल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये 3 जागांची मागणी

ठाकरे बंधूंची युती होत असताना मुंबईत मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसनं विरोध केला आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मनसेबाबत सावध भूमिका घेतली आहे. मनसे सोबत युतीचा प्रस्ताव आलेला नाही, आल्यास आघाडी म्हणून निर्णय घेऊ, असं स्पष्ट केलंय. 2017 मध्ये मुंबई मनपा निवडणुकीतलं चित्र पाहिलं तर शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या. तर मनसेकडे सात नगरसेवक होते.

मात्र आता परिस्थिती बदलली आहे. शिवसेना फुटली आहे. विधानसभा निवडणुकीतही ठाकरे बंधूंच्या पक्षाची कामगिरी समाधानकारक झाली नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती महायुतीला रोखणार का? आणि बीएमसीतली गेल्या काही दशकांची सत्ता ठाकरे अबाधित राखणार का ? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमचं WhatsAPP कुणीतरी वाचतंय? लीक झालेल्या डेटात तुमचाही नंबर? VIDEO

Maharashtra Politics : 'उदय सामंत शिंदेसेना फोडणार'; ठाकरे गटाच्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Friday Horoscope : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना अडचणीवर मात करावी लागणार

Uddhav Thackeray : साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश म्हणजे हिंदुत्वाचा अपमान? उद्धव ठाकरे कडाडले

कोकणात राणे बंधू आमने-सामने, भावांच्या संघर्षाला नारायण राणेंचा आशीर्वाद?

SCROLL FOR NEXT