nitin gadkari and gopinath munde  Saam tv
महाराष्ट्र

'नितीन गडकरी जाणीवपूर्वक गोपीनाथ मुंडे यांना ट्रॅपमध्ये अडकवत होते'; ठाकरे गटाच्या महिला नेत्याचा गोप्यस्फोट

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा गोफ्यस्पोट जाहीर सभेत केला आहे.

अभिजीत घोरमारे

Sushma Andhare News : 'नागपूर आणि बीड यांचा संघर्ष पहिल्यापासून चालत आला आहे. केंद्रीय गडकरी नितीन गडकरी हे गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक ट्रॅपमध्ये अडकवत होते, असा गोफ्यस्पोट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जाहीर सभेत केला आहे. आता देवेंद्र फडणवीस हे पंकजा ताई मुंडे यांना अडकवत असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. (Latest Marathi News)

सुषमा अंधारे यांची यात्रा महाप्रबोधना यात्रा भंडारा जिल्ह्यात पोहोचली आहे. भंडारा जिल्ह्यातील सभेत सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. सुषमा अंधारे यांनी यावेळी संभाजी भिडे यांच्यावरही टीका केली. 'टिकलीवरून महिला पत्रकाराला बोलणारे संभाजी भिडे हे अमृता फडणवीस वहिनींना मंगळसुत्रावरील वक्तव्यावर बोलतील का ? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी केला.

मुंबईच्या साम टीव्हीच्या महिला पत्रकाराला मुलाखत घेताना 'तुम्ही टिकली नाही म्हणून मी प्रतिक्रिया देणार नाही, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते. दरम्यान, अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या मंगळसूत्र घालते की मला गळा आवळल्या सारखे होते असा म्हणाल्या. यावरून संस्कृती जपणारे संभाजी भिडे हे अमृता फडणवीस यांना जाब विचारतील का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

...आणि मुलीच्या फोटो पाहून सुषमा अंधारे जाहिर सभेत रडल्या

आपल्या मुलीच्या फोटो भेट स्वरुपात पाहून सुषमा अंधारे जाहिर सभेत रडल्या. मागील महिनाभरापासून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेनिमित्त राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या चिमुकलीची भेट न होत असल्याने त्या भावुक झाल्याचे चित्र भंडारा येथील सभेदरम्यान पाहायला मिळाले.

भंडारा येथील पदाधिकाऱ्यांनी सुषमा अंधारे यांना त्यांच्या छोट्या मुलीसह चा एक फोटो सप्रेम भेट दिल्यानंतर हा भावनिक स्पर्श पाहायला मिळाला. आपल्या मुलीचा फोटो पाहून सुषमा अंधारे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT