हिंगोली: गद्दारांनो हिम्मत असेल तर तुमच्या बापाच्या नावाच्या जागी बाळासाहेबांचे नाव लावा आणि बापाचं नाव काढून टाका, अशी जहरी टीका शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांवर केली आहे.
शिंदे गटाने त्यांच्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) फोटो लावला आहे. यावरुन त्यांनी आता शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ते आज हिंगोली (Hingoli) येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी जाधव यांनी आज बंडखोर आमदारांवर हल्लोबोल केला.
पाहा व्हिडीओ -
ते म्हणाले, 'या गद्दारांनी उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात केला. आता बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात त्यांचा फोटो लावतात. मागे बाळासाहेबांच्या फोटो आणि नावावरुन उद्धव ठाकरे म्हणाले होते, 'तुमच्यात हिम्मत असेल तर, तुमच्या बापाच्या नावाने मतं मागा माझ्या बापाचं नाव वापरु नका', तर यावर भाजपचे चाणक्यांनी लगेच शब्द फिरवला आणि म्हणाले बाळासाहेब तुमचे वडील असले तरी ते आमचे नेते आहेत, ते राष्ट्रीय़ नेते आहेत.
तर मी आता दोन पावले पुढे जाऊन सांगतो, उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) नावं असणाऱ्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची पाटी तुम्ही काढली. आता माझं त्या ४० गद्दारांना सांगणं आहे की, तुम्ही तुमच्या घरासमोर असणारी नावाची पाटी बदला, पहिलं तुमचं नाव आणि नंतर बाळासाहेबांचे नाव लावा, तुमच्या बापाचं काढून टाका.
आम्हाला काहीही वाईट वाटणार नाही. आम्हाला पण तुमची निष्ठा पाहायची आहे, बाळासाहेबांवरील निष्ठा पाहायची आहे. असा शब्दात भास्कर जाधव यांनी बंडखोर आमदारांवर बोचरी टीका केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.