शरद पवारांच्या घरी जाणाऱ्या आशिष शेलारांनी मीडियाला पाहताच घेतला यू-टर्न; राजकीय चर्चांना उधाण, पाहा Video

शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी मुबंई भाजपचे अध्यक्ष, आमदार आशिष शेलार येणार होते.
Sharad Pawar And Ashish Shelar
Sharad Pawar And Ashish ShelarSaam TV
Published On

भूषण शिंदे -

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आज मुबंई भाजपचे अध्यक्ष, आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) येणार होते. मात्र, प्रसारमाध्यमांना पाहून शेलार यांची गाडी सिल्व्हर ओक येथे आत मध्ये न जाता अचानक वळण घेऊन सरळ निघून गेली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी 28 तारखेला पार पडणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) अध्यक्षपदाची निवडणुकीसंर्भात पुर्वनियोजीत अशी एक बैठक पार पडणार होती. या बैठकीसाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होतं.

पाहा व्हिडीओ -

अशातच काही वेळापूर्वी या बैठकीला सहभागी होण्यासाठी आशिष शेलार सिल्वर ओक (Silver Oak) या शरद पवारांच्या निवासस्थानाजवळ पोहोचत होते. मात्र, माध्यमांचे कॅमेरे पाहताच आशिष शेलार यांनी या ठिकाणाहून पळ काढत बैठकीला जाणं टाळल्याचं पाहायला मिळालं.

यंदा MCA च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ५ उमेदवार आहेत त्यामध्ये मिलिंद नार्वेकर, संदीप पाटील, विजय पाटील,अमोल काळे आणि नवीन शेट्टी मात्र खरी चुरस संदीप पाटील आणि अमोल काळे यांच्यात असणार आहे. संदीप पाटील यांना शरद पवारांचा तर काळे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सपोर्ट आहे.

Sharad Pawar And Ashish Shelar
Gyanvapi Virdict: ज्ञानवापी प्रकरणी मोठा निर्णय, न्यायालयाने मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली

त्यामुळे आता या निवडणुकीवर सगळ्यांचा नजरा आहेत. तर विचारधारा वेगळी असल्यामुळे आता राजकीय नेते एकमेकांना उघडपणे भेटायला देखील कचरतात की काय? असा प्रश्न आजच्या या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com