MVA  
महाराष्ट्र

MVA : ठाकरे मविआतून बाहेर पडणार? मुंबई महापालिका निवडणुकीसाठी संजय राऊतांकडून स्वबळाचे संकेत

BMC Election: विधानसभेला मोठी पिछेहाट झाल्यानंतर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंनी स्वबळाची चाचपणी सुरु केल्याची चर्चा रंगलीय. त्यापार्श्वभुमीवर राऊतांनी स्वबळाचे संकेत दिलेत.. मात्र ठाकरे बीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची कारणं काय आहेत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. त्यामुळे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुर्वी ठाकरेंनी सावध पावलं टाकायला सुरुवात केलीय. तर संजय राऊतांनी मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत. मात्र काँग्रेसने वेट अँड वॉचची भूमिका घेतलीय.

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाने पराभूत उमेदवारांची बैठक घेतली होती. त्या बैठकीतही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची मागणी केली होती. त्यातच आता ठाकरे गटाने राज्यातील 14 महापालिकांसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे संकेत राऊतांनी दिलेत...मात्र ठाकरे गट मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची कारणं काय आहेत? पाहूयात.

ठाकरे मविआतून बाहेर पडणार?

ठाकरेंनी जिंकलेल्या विधानसभेच्या 20 पैकी 10 जागा मुंबईतील

मविआ म्हणून लढल्यास मुंबईत कमी जागा मिळणार

मुंबईत सर्वाधिक जागा लढवून जास्त जागा जिंकण्याची रणनीती

मविआसोबत लढल्यास आक्रमक हिंदुत्व, मराठीच्या मुद्द्याबाबत मर्यादा येण्याची शक्यता

राज्यात युतीची सत्ता असतानाही ठाकरेंनी 2017 च्या महापालिका निवडणूक स्वबळावर लढवली होती. त्यावेळी ठाकरेंनी 84 जागा जिंकल्या होत्या.. त्यामुळे महाविकास आघाडीत राहून ठाकरे महापालिका निवडणूका लढवणार की मविआसोबत काडीमोड घेऊन स्वबळावर रणशिंग फुंकणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Shock : मोटार सुरु करताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांचा मात्र घातपाताचा आरोप

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

SCROLL FOR NEXT