Thackeray Group Shiv Sena Nanded City Cheif Kidnap: Saam Tv
महाराष्ट्र

Nanded : ठाकरे सेनेच्या शहर प्रमुखांचे अपहरण, पोलिसांनी तासाच्या आत केली सुटका

Nanded Local News : नांदेडमध्ये देखील अपहरणाचा थरार शुक्रवारी रात्री पहावयास मिळाला. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नांदेड शहरप्रमुख गौरव कोटगीरे यांचे काही अज्ञातांनी अपहरण केले.

Namdeo Kumbhar

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही, प्रतिधिनी नांदेड

Nanded Local News Updates : बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंच पती संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर नांदेडमध्ये देखील अपहरणाचा थरार शुक्रवारी रात्री पहावयास मिळाला. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नांदेड शहरप्रमुख गौरव कोटगीरे यांचे काही अज्ञातांनी अपहरण केल्याची घटना घडली. त्यानंतर नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करत तासाभरात गौरव कोटगीरे यांची सुटका केली.

ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख गौरव कोटगीरे हे आपल्या कारचे काम करण्यासाठी नांदेड शहरातील बाफना टी पॉईंट येथील एका गॅरेजवर थांबले होते. शुक्रवारी रात्री नऊ वाजता नांदेड शहरातील बाफना टी पॉईंट येथील गॅरेज समोरून अचानक कोटगीरे यांचे अज्ञातांनी अपहरण केले. ही माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच नांदेड पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली. अवघ्या पाऊण तासात गौरव कोटगीरे यांची अपहरणकर्त्यांपासून सुटका झाली. नांदेड शहराच्या बाहेर असलेल्या चंदासिंग कॉर्नर येथे कोटगीरे यांना अपहरणकर्त्यांनी सोडून दिले. हा अपहरणाचा संपूर्ण घटनाक्रम ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख गौरव कोटगीरे यांनी सांगितला.

पोलिसांनी तात्काळ नाका बंदी केली आणि कोटगीरे यांचा जीव वाचला. गौरव कोटगीरे यांनी इतवारा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी दिली.

ठाकरे शिवसेनेचे नांदेड शहरप्रमुख गौरव कोटगीरे यांचे अपहरण झाल्या नंतर शिवसैनिक पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने जमले होते. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लोहा येथील एका शिवसैनिकाचे अपहरण करून त्याचे बोटे छाटण्यात आली होती. तशीच पुनरावर्ती आज झालेली आहे.पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोटगीरे यांचा जीव वाचला.परंतु प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात दहशत निर्माण केली आहे.असा आरोप ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी केला आहे.मुख्यमंत्री यांनी आशा गुंड आमदारा पासून नांदेड जिल्ह्यातील जनतेचे संवरक्षण करावं अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी दिला आहे.

गौरव कोटगीरे लोहा-कंधार विधानसभा मतदार संघात ठाकरे गटाचे उमेदवार एकनाथ पवार यांच्या प्रचारासाठी ऍक्टिव्ह होते.सोशल मीडियाच्या माध्यमातून कोटगीरे हे विरोधकांचा समाचार घ्याचे. त्यामुळे कोटगीरे यांच्या अपहरण मागे राजकीय हात आहे का? किंवा आर्थिक व्यवहारातून कोटगीरे यांचे अपहरण झाले का? याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

SCROLL FOR NEXT