Sushma Andhare On Neelam Gorhe: Saamtv
महाराष्ट्र

Sushma Andhare: नाक घासलं तरी माफी नाही; सुषमा अंधारे कडाडल्या, नीलम गोऱ्हेंविरोधात दाखल करणार अब्रू नुकसानीचा दावा

Sushma Andhare On Neelam Gorhe: सुषमा अंधारे हे निलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करणार आहेत.

Bharat Jadhav

ठाकरे गटात एका पदासाठी दोन मर्सिडीज कार द्याव्या लागतात, असा खळबळजनक आरोप शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला होता. हे विधान मात्र त्यांच्या अंगलट आले आहे. नेत्या नीलम गोऱ्हे या विधानामुळे अडचणीत सापडल्या आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. सुषमा अंधारे गोऱ्हेंविरोधात अब्रु नुकसानीचा दावा करणार आहेत.

गोऱ्हे यांनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना एसएफआयमधून केली, नंतर भारिपमध्ये उडी मारली. त्यांना प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे ओळख मिळाली. नंतर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी बेईमानी केली. त्यांनी शरद पवारांच्या पक्षाशी बेईमानी केली मग त्या आमच्याकडे आल्या. त्या जिथे राहतात त्यांनी एक शाखा उभी केली नाही, लोकांना कसे बाजूला ठेवता येईल हेच त्यांनी केलं, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. त्यांनी २०१७ ते २०२२ पर्यंत माझा ठाकरे पक्षात प्रवेश होऊ दिला नाही, असा आरोपही सुषमा अंधारेंनी केला.

नीलम गोऱ्हेंच्या शब्दकोशात प्रामाणिकपणा हा शब्द नाहीय. नीलम गोऱ्हेंना ज्या पक्षांनी चारवेळा आमदारकी दिली. गोऱ्हेंनी त्यांच्या मॉडेल कॉलनीतील भागात शिवसेनेची एक शाखाही उघडली नाही. त्यांनी पक्ष संघटनेसाठी कोणतं काम केलं नाही,असं सुषमा अंधारे म्हणाल्या. गोऱ्हेंनी त्यांनी माझा शिवसेनेत पक्षप्रवेश होऊ दिला नाही. माझा पक्षप्रवेश होईपर्यंत नीलम गोऱ्हेंच्या कानावर पडू दिलं नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

नीलम गोऱ्हे ह्या पक्षात कोणाला वाढू देत नाहीत. पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा नाही द्यायचा हे सगळं काम नीलम गोऱ्हे बघत. आमदारकीसाठी मर्सिडीज दिल्या तर त्या नीलम गोऱ्हेंनी कुठून आणल्या? व्यवसाय काय, की त्यांची अडीचशे कोटींची संपत्ती आहे? असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. एकनाथ शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांनाच माहिती असेल की कारचं कलेक्शन किती होतं. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे म्हणणे कोर्टात सादर करावे, नाहीतर नाक घासून माफी मागितली तरी आमचा लढा चालू असणार , असंही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT