Sushma Andhare Cried
Sushma Andhare Cried Saam Tv
महाराष्ट्र

Sushma Andhare Cried: अन् भाषण देताना सुषमा अंधारे ढसाढसा रडल्या, म्हणाल्या -'मी किती ही ओरडले तरी...'

Priya More

Satara News: ठाकरे गटाच्या (Thackeray Faction) महिला उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) साताऱ्यातील एका कार्यक्रमात भाषण देताना ढसाढसा रडल्या. साताऱ्यामध्ये भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात समाज, वंचित, भटक्या जाती यांच्याविषयी भाषण देताना सुषमा अंधारे यांनी त्यांचे अनुभव सांगितले. हे सांगत असताना त्यांना अश्रू अनावर झाले.

'या देशात वाघांची, हत्तींची गणना होते, पण भटक्यांची जनगणना व्हावी असं सरकारला वाटत नाही. जनावरांपेक्षा आमची वाईट अवस्था आहे.' असे सांगत सुषमा अंधारे या भावुक झाल्या. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी हजेरी लावली होती. शरद पवारांच्या समोरच त्यांना अश्रू अनावर झाले. तसंच, 'महाविकास आघाडीमध्ये सर तुम्ही असायला हवं.' असे आवाहन त्यांनी शरद पवारांना केले आहे.

सुषमा अंधारेंनी सांगितले की, 'मला भटक्या विमुक्तांच्या काही व्यथा मांडायच्या नाहीत. पण जागतिकीकरणात भटके जास्त विस्थापित झाले आहेत. इतक्या जाती आहेत तर काहींना अशीपण जात आहे का? असं आश्चर्य वाटते. सध्या शहरातील लोकांना वयाच्या पाचव्या, सहाव्या वर्षात संगणक हाताळायला मिळत आहे. पण यांना कुठे ते कळतं? मी माझे एमए शिक्षण पूर्ण केल्यावर मला कम्प्युटरचा डबा पाहायला मिळाला. भटक्या जातीतील अनेक लोकं आहेत की जी संधी मिळाली की मोठी होतात.'

सुषमा अंधारेंनी पुढे सांगितले की, 'माझी अडचण होत होती की मी किती ही ओरडले तरी माझा आवाज जात नव्हता. उद्धव साहेबांचे मी आभार मानते की त्यांनी मला माझे मुद्दे मांडायला दिले. शरद पवारसाहेबांच्या पुढे मी धाडसाने बोलते आहे कारण आम्ही झोपड्यातील माणसं आहोत.' तसंच, '

आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्यावर टिप्पणी करत असताना एकाही पोलिस ठाण्यात त्याची तक्रार लिहून घेतली गेली नाही. सभागृहात आपण सगळे विरोधी पक्षनेते म्हणून बाकावर बसतो. सार्वजनिक ठिकाणी हा सगळा कंटेंट आहे. सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी यासंबंधी प्रश्न विचारायला हवा होता. माझं चुकत असेल तर कान पकडा. मी लाख वेळा माफी मागायला तयार आहे.' असे रडत रडत सुषमा अंधारेंनी सांगितले.

पुढे त्यांनी सांगितलं की "आमचा असाही कोणी आधार नाही. आम्ही मंत्रीपद वैगैरे डोक्यात ठेवून राजकारणात आलेलो नाही. भटक्यांना आधार असावा, आमचे प्रश्न मांडणारं कोणीतरी असावं यासाठी आलो आहोत. सगळे बोलतात माझ्या बोलण्यात रग आहे. याचं कारण माझ्यात धग आहे. पण लोक माझ्या बापापर्यंत जातात, वाटेल ते बोलतात. साहेब हे तुमच्या समोर मांडले पाहिजे.'

'ज्या जमिनीत मी उगवून आले ती कसदार आहे आणि आम्ही दमदारपणे उगवून आलो आहोत.', असे सुषमा अंधारे यांनी स्पष्टपणे सांगितलं. यावेळी सुषमा अंधारे यांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी लिहिलेले पत्र वाचून दाखवले. हे पत्र वाचून दाखवताना देखील त्यांना अश्रू अनावर झाले. साहेब तुमची महाविकासआघाडीला गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच माझं संपूर्ण कुटुंब आज तुमच्यामुळे सुरक्षित आहे असं देखील त्या म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT