Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: 'मुंबईत मुका घ्या मुका कार्यक्रम सुरू...' संजय राऊतांची खोचक टीका, म्हणाले; पहिले आरोपी सुर्वेचं...

Sheetal Mhatre Viral Video: आदित्य एक मंत्री, नेता म्हणून जागतिक ठसा उमटवत आहेत, आदित्य हे एक राजकीय भविष्य आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंचे कौतुक केले आहे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

New Delhi: माजी नगरसेविका आणि शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांच्या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणाने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. काही दिवसांपूर्वी शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एका रॅलीमधील व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता, ज्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जोरदार संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटकही करण्या आली आहे.

याबद्दल बोलताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लबोल करत मुंंबईत मुका घ्या मुकाचे कार्यक्रम सुरू असल्याची खोचक टीका केली आहे.

काय म्हणाले खासदार संजय राऊत..

राज्यात सध्या सुरू असलेल्या शितल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरुन ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. "राज्यात मुका घ्या मुकाचे कार्यक्रम सुरू आहेत, असे म्हणत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक का केली जात आहे, पहिले गुन्हेगार सुर्वे आहेत, त्यांच्या मुलाला अटक का केली नाही, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच यावेळी बोलताना आम्ही मुका घ्यायला सांगितला होता का," अशी खोचक टीकाही संजय राऊत यांनी केली...

आदित्य ठाकरेंचे केले कौतुक... (Sanjay Raut On Aditya Thackeray)

यावेळी संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांचा समावेश वर्ड इकॉनॉमिक फोरममध्ये समावेश झाल्याबद्दल अभिनंदन केले. "बाळासाहेब ठाकरे शक्तिशाली नेते होते आणि त्यांचे नातू आदित्य ठाकरे यांचा समावेश वर्ड इकॉनॉमिक फोरममध्ये समावेश होणे हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने गौरव आहे, आदित्य एक मंत्री, नेता म्हणून जागतिक ठसा उमटवत आहेत, आदित्य हे एक राजकीय भविष्य आहे," असे ते यावेळी म्हणाले..

विरोधी पक्षचं टार्गेट...

"ठाकरे परिवार, सहकारी यांचे बाबतीत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. संपत्तीचा विषय, व्हिडिओ मॉंर्फिंगचा विषय, फक्त शिवसेना आणि ठाकरे परिवार यांना लक्ष करून राजकारण सुरू आहे, राज्यात खोके वाल्यांच्या संपत्तीचा हिशोब मागायला हवा पण ते आमच्या संपत्तीचा हिशोब मागत आहेत," असे म्हणत फक्त विरोधी पक्षांना टार्गेट केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Speed Rail : १९ तासांचा प्रवास फक्त २ तासात, हाय-स्पीड ट्रेनचा प्रवास वाऱ्याच्या वेगाने होणार

Chirote Recipe : दिवाळीत बनवा मऊसूत- खुसखुशीत चिरोटे, एक घास खाताच गावाची आठवण येईल

Sonakshi Sinha : कतरिनानंतर सोनाक्षी सिन्हा देणार गुडन्यूज? 'तो' VIDEO पाहून सोशल मीडियावर रंगली प्रेग्नेंसीची चर्चा

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Sharad Pawar Setback : शरद पवारांना जबरी धक्का, ३ निष्ठावंताचा 'जय महाराष्ट्र', जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याचं कारण काय?

SCROLL FOR NEXT