Sanjay Raut On Neelam Gorhe Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut On Neelam Gorhe: ...अशांना आम्ही श्रद्धांजली वाहतो, नीलम गोऱ्हेंवर टीका करताना संजय राऊतांचा तोल सुटला

Neelam Gorhe Join Shinde Group: नीलम गोऱ्हेंच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.

Priya More

Pandharpur News: शिवसेना ठाकरे गटाच्या (Thackeray Group) प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शुक्रवारी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये (Eknath Shinde Group) प्रवेश केला. नीलम गोऱ्हेंच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.

नीलम गोऱ्हे यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. 'काही महिन्यांसाठी आपले पद वाचवण्यासाठी नीलम गोऱ्हे पक्ष सोडून गेल्या. अशांना आम्ही श्रद्धांजली वाहतो.', अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे. पंढरपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊतांनी हे वक्तव्य केले आहे.

संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका करताना सांगितले की, 'नीलम गोऱ्हे यांना ५ वेळा आमदार केले. त्यांना मिळालेले वैधानिक पद शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाले. असे सोडून गेल्याबद्दल लाज वाटते आणि महाराष्ट्राला सुद्धा नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल लाज वाटते. ४ ते ५ महिन्यांसाठी आपले पद वाचवण्यासाठी नीलम गोऱ्हे पक्ष सोडून गेल्या. अशा लोकांना आम्ही श्रद्धांजली वाहतो.' नीलम गोऱ्हेंवर टीका करताना संजय राऊतांचा तोल सुटला.

संजय राऊतांनी पुढे सांगितले की, 'महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेच्या मनातील साकडे घालायला मी आलोय. राज्याची ओळख संतांची भूमी नसून आता गद्दारांची भूमी म्हणून ओळख होत आहे. त्यामुळे ही ओळख पुसण्याची पांडुरंग शक्ती देवो. यशवंतराव , अनेक मेहापुरुषांच्या नावाने ओळखला जाणारा महाराष्ट्र आता गद्दार यांच्या नावाने ओळखला जातोय. हुकूमशाही , दडपशाही , पैशाचे राजकारण सुरू आहे. यासाठी सर्व घटकांनी एकत्र यावे.'

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. त्यासाठी राज्यातील अनेक ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी सांगितले की, 'आम्ही राज ठाकरे यांच्याशी थेट बोलू शकतो. उद्धवसाहेब तर त्यांचे भाऊ आहेत. त्यामुळे पानसे किंवा कुणालाही मध्यस्थी करण्याची गरज नाही.

शिंदे गटात सहभागी झालेल्यांना संजय राऊत यांनी थेट चॅलेंज केले आहे. 'मी बाळासाहेब यांचा कार्यकर्ता आहे. मी बाजूला सरकतो. येणार आहेत का ४० आमदार परत?', असा सवाल त्यांनी केला आहे. 'मलाही पक्ष सोडता आला असता. मी तुरुंगात गेलो होतो. पण पक्षाने मला खूप दिले आहे. भाजपच्या तंबूत जाऊन टिकणे सोपे नाही. शिवसेना २५ वर्षे राहिली आणि टिकली. बाकीच्यांचे अवघड आहे. मला पक्षाने पाठवले म्हणून मी राज्यसभेवर जातोय. मिंधे गटाचे आमदार हे पैशाने विकले गेले आहेत., ', अशी टीका त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT