Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: कल्याणमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ३८ वर्षे सोबत, शिंदेंच्या उठावातही खंबीर राहिला, शेवटी बड्या नेत्यानं साथ सोडलीच

ठाकरे गटाची पडझड सुरूच आहे. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' ठोकला आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Kalyan News: ठाकरे गटाची पडझड सुरूच आहे. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' ठोकला आहे. आता अरविंद मोरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. अरविंद मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. (Latest Marathi News)

ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरविंद मोरे हे कल्याणमध्ये ३८ वर्षे शिवसेनेत कार्यरत आहेत. शाखाप्रमुख ,विभागप्रमुख , शहरप्रमुख ,नगरसेवक ,सभागृह नेता आता उपजिल्हाप्रमुख म्हणून अरविंद मोरे कार्यरत होते. अशी अनेक पदे त्यांनी भूषवली.

एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक अशी अरविंद मोरे यांची ओळख होती. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर अरविंद मोरे यांनी ठाकरे गटाला समर्थन केलं होतं. आता मोरे यांनी ठाकरे गटाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

'ठाकरे गटात स्थानिक पातळीवर एकाधिकारशाही सुरू आहे. मानसन्मान मिळत नसल्याने शिवसेनेत प्रवेश करत असल्यची प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद मोरे यांच्या सोडचिठ्ठीमुळे कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठे भगदाड पडल्याचे बोलले जात आहे. अरविंद मोरे यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाने कल्याणमधील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

आज सायंकाळी शिवसेनेत प्रवेश करणार

ठाकरे गटात नेत्यांची पडझड सुरूच आहे. कल्याणमध्ये अरविंद मोरे यांनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरविंद मोरे सायंकाळी शिवसेनेनेत प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अरविंद मोरे हे प्रवेश करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: सोनं १२,४८९ रुपयांनी स्वस्त, तर चांदीचे दर ₹४०,०००नी घसरले; इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम

Shocking : हृदयद्रावक! १० महिन्यांच्या चिमुकलीचा उकळत्या दुधात पडून मृत्यू

काँग्रेसच्या खासदाराचा तडकाफडकी राजीनामा! राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : दिव्यांग शेतकऱ्यांच्या कांद्याला अवकाळी पावसाचा फटका

Sugarcane juice: उस आणि मशिन न वापरता घरच्या घरी तयार करा उसाचा रस

SCROLL FOR NEXT