Gunaratna Sadavarte saamtv
महाराष्ट्र

Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना कानाखाली मारा, एक लाख मिळवा; ठाकरेसेनेकडून बक्षीस जाहीर

Gunaratna Sadavarte: हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करण्यात आल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केलीय. त्यामुळे ठाकरेसेनेचे नेतेही चांगलेच आक्रमक झालेत. सदावर्तेंना कानशिलात मारणाऱ्यांला थेट बक्षीस जाहीर केलीय...नेमकं प्रकरण काय आहे? पाहूयात.. या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी

वकील गुणरत्न सदावर्तेंची ही ठाकरे बंधूंवरील टीका ऐकलीत.सदावर्तें त्यांच्या अशा वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. राज्य सरकारने हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येऊन विजयी मेळावा साजरा करणार आहेत. मात्र, या विजयी मेळाव्यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली.

हिंदीचा सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर सदावर्ते यांच्या घराबाहेर मनसेकडून जल्लोष साजरा करण्यात आला होता. त्यात गुणरत्न सदावर्तेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवरुन शिवसैनिक आक्रमक झालेत. ठाकरेसेनेचे प्रशांत भिसे यांनी तर वायफळ बडबड करणाऱ्या सदावर्तेंना धडा शिकवण्याची गरज असल्याचं म्हणत सदावर्तेंच्या कानशिलात मारणाऱ्यांला थेट एक लाखाचं बक्षिस जाहीर केलंय.

महायुती सरकारच्या प्रत्येक निर्णयानंतर सदावर्ते सरकारची बाजू मांडताना दिसतात. मात्र यावेळी महायुतीची बाजू मांडताना सदावर्तेंनाच टीकेचा धनी व्हावं लागतयं. त्यामुळे ठाकरे बंधूंसंदर्भातील वक्तव्यानं सदावर्तेंच्या अडचणी वाढणार की सदावर्ते विरोधकांना शिंगावर घेऊन वकिली खाक्या दाखवणार, हे बघणं औत्सुक्याचं असेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT