uddhav thackeray and sharad pawar Saam Tv
महाराष्ट्र

Thackeray Vs Sharad Pawar Group: ठाकरे - शरद पवार गट आमनेसामने, एकाच जागेवरून दोन्ही पक्षांकडून उमेदवार जाहीर; होणार मैत्रीपूर्ण लढत?

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि शरद पवार गट हे एकमेकांच्या विरोधात लढताना दिसणार आहे. याचे कारण म्हणजे दोन्ही पक्षाने एकाच जेगावरून आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

Satish Kengar

विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यातच महाविकास आघाडीत काही जागांवरून अजूनही तिढा कायम आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याचे कारण म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी एकाच जागेवरून आपआपले उमेदवार जाहीर केले आहेत. दोन्ही पक्षाने एकाच जागेवरून आपले उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचं चित्र आहे.

कोणत्या जागेवरून दोन्ही पक्षात तिढा?

अलीकडेच शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये ठाकरे गटाकडून परांडा विधानसभा मतदारसांघात रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यातच आता शरद पवार गटाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. ज्यात त्यांनी परांडा विधानसभा मतदारसांघात राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यातच आता परांडामध्ये ठाकरे गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढत पाहायला मिळणार आहे.

ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?

परांड्यातून शरद पवार गटाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे उमेदवार रणजित पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''माझी सामनामधून उमेदवारी त्यांनी (तघकारे गटाने) जाहीर केली आहे. त्यामुळे कुठलाही संभ्रम नाही. मी सोमवारी माझा उमेदवारी राज दाखल करणार आहे.'' 'साम टीव्ही'शी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मैत्रीपूर्ण लढतीसाठी तुमची तयारी आहे का? असं त्यांना रणजित पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, आमचे पक्षप्रमुख उद्धव तटकरे हे जे नैर्णय घेतील, तो मी मेनी करेल, असं ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुणे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसच्या दोन गटांमध्ये वाद

Pune Politics : भाजपच्या दुसऱ्या यादीनंतर पुण्यात नाराजीचे फटाके, शहराध्यक्षांच्या पोस्टने चर्चांना उधाण, VIDEO

Maharashtra Election : मुंबईतील या १८ जागांवर भाजप लढणार?

एक नंबर! Airtel ची धमाल ऑफर; 'या' ३ प्लॅन्ससोबत मिळेल ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स

MNS Candidate Fifth List: पनवेलमधून योगेश चिले, बीडमधून कोणाला उमेदवारी? मनसेची ५ वी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली संधी? वाचा...

SCROLL FOR NEXT