Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीला भाजपचा खोडा? भाजपला ठाकरे बंधू एकत्र नकोत, कुणी केला दावा?

Maharashtra Political News : ठाकरे बंधूंची युती भाजपचे मनसुबे उद्ध्वस्त करण्याची शक्यता आहे... त्यामुळेच ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत, अशी रणनीती भाजपने आखल्याचा आरोप करण्यात आलाय.. मात्र हा आरोप कुणी केलाय? ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा भाजपला कसा फटका बसू शकतो? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

19 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अचानक राज ठाकरेंची भेट घेत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनाच सुरुंग लावलाय... तर दोन्ही बंधू एकत्र येऊ नये म्हणूनच भाजपने खेळी केल्याचा आरोप काँग्रेसने केलाय.

खरंतर लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठींबा देणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडाली. पक्षाची कामगिरी एका आमदारावरुन शुन्यावर आली आहे. तर ठाकरे गटाचाही दारुण पराभव झाला.. त्यामुळेच आपापसातील भांडण विसरुन ठाकरे बंधूंनी एकमेकांना साद घातली.. तर कार्यकर्त्यांचंही मनोमिलन सुरु झालं.. मात्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेत नवा डाव टाकलाय... मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास राजकीय गणितं कसे बदलतील? पाहूयात...

- ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतांचं विभाजन टळेल

- मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्यास बीएमसी जिंकणं शक्य

- मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर आणि नाशिकमध्ये राज यांचा प्रभाव

- राज ठाकरेंचं भाषण आणि उद्धव ठाकरेंची संघटनशक्तीचा दोघांनाही फायदा

तर राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनंतरही ठाकरे गट युतीसाठी आशेवर आहे.

2017 च्या मुंबई महापालिका निवडणूकीत

शिवसेनेचे 84 तर भाजपचे 82, मनसेचे 7, नगरसेवक निवडून आले होते...मात्र महापालिकेची मुदत संपताना शिवसेनेचं संख्याबळ 97 पर्यंत गेलं होतं.. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर 55 नगरसेवक ठाकरेंसोबत राहिले तर 44 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय..

त्यामुळेच ठाकरेंच्या घटलेल्या संख्याबळामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला होता... मात्र आता ठाकरे बंधू एकत्र आल्यास भाजपला फटका बसण्याची शक्यता असल्यानेच युतीत मीठाचा खडा टाकला जात असल्याचं म्हटलं जातंय.. मात्र फडणवीसांच्या भेटीनंतरही ठाकरे बंधू एकत्र येणार की राज्यात नवं राजकीय समीकरण पहायला मिळणार? याचीच उत्सुकता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

BJP MLA Death: भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे निधन, ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jio Home Offer: Jio ची जबरदस्त ऑफर! ६० दिवस मोफत इंटरनेट, १००० टीव्ही चॅनेल आणि OTT अ‍ॅप्स फ्री

Manmad : नगर- मनमाड महामार्गावर अग्नितांडव, हार्वेस्टर वाहनाला भीषण आग |VIDEO

Maharashtra Live News Update: संघटीत गुन्हा निष्पन्न, बागूल टोळीवर मोक्का लावण्याच्या हालचाली सुरू

SCROLL FOR NEXT