Thackeray brothers Raj and Uddhav during the announcement of their political alliance for the Mumbai civic polls. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरेंचं ठरलं, जागावाटपावर अडलं? मराठी पट्ट्यासाठी ठाकरेंमध्ये रस्सीखेच?

MNS–UBT Alliance Announced: ठाकरेंची युती जाहीर झाली.. मात्र अजूनही जागा वाटपावर तोडगा निघाला नाही.. नेमक्या कोणत्या जागांवर तिढा कायम आहे... आणि चर्चेच्या फेरीतून कधीपर्यंत तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे..

Bharat Mohalkar

तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधूंनी मुंबईसाठी एकीचा नारा दिला... युतीची घोषणाही झाली.. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 48 तास बाकी असतानाही मनसे आणि ठाकरेसेनेतील जागा वाटपाचा तिढा काही सुटत नसल्याचं चित्र आहे... मराठी पट्ट्यातील जागांबरोबरच आमदार आणि खासदारांच्या घराणेशाहीमुळे जागा वाटपात जोरदार रस्सीखेच सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय...

ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाचा पेच

- मराठी बहुल भागांमध्ये जागावाटपांचा पेच

- मनसेला हव्या अतिरिक्त 18 जागा

- दादर-माहिम, वरळी, शिवडी, विक्रोळी, भांडुप, जोगेश्वरी, चांदिवलीतील जागांसाठी आग्रही

- प्रत्येक मतदारसंघात मनसेला हव्या 2 ते 3 जागा

- मातोश्रीतील बैठकीत मनसेचा प्रस्ताव

मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येत युतीची घोषणा केली.. मात्र त्याआधीही दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाच्या चर्चेच्या फेऱ्या सुरुच होत्या... आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 48 तास बाकी आहेत... मात्र त्यानंतरही दोन्ही पक्षांच्या जागा वाटपासाठी बैठकांचं सत्र सुरुच आहे...त्यातच मनसे आणि ठाकरेसेनेत 194 आणि वॉर्ड 111 वरुन रस्सीखेच सुरु आहे...

मात्र त्यामागे कारण लपलंय आमदार आणि खासदारांच्या नातेवाईकांनी केलेली उमेदवारीची मागणी... वॉर्ड 194 मधून संतोष धुरी मनसेचे माजी नगरसेवक आहेत.. मात्र तिथं ठाकरेसेनेचे आमदार सुनील शिंदेंचे भाऊ निशिकांत शिंदे इच्छूक आहेत.. तर वॉर्ड 111 मध्ये संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांनीही निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय...

संजय राऊतांनी मात्र जागा वाटपात कुठलीही रस्सीखेच नसल्याचं सांगितलंय... तर मनसे आणि ठाकरेसेनेतील जागावाटपातील रस्सीखेचमुळे शिंदेसेनेच्या हाती आयतं कोलित मिळालंय.. ठाकरेसेना आणि मनसेतला वाद काही जागांपुरता मर्यादित असला तरी यामुळे जागावाटपावर शिक्कामोर्तब रखडलंय. आता या जागांवर आमदार-खासदारांच्या भावानांच उमेदवारी मिळणार की निष्ठावंतांना संधी मिळणार? यावर विजयाचं समीकरण अवलंबून असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अकोल्यात भाजपने डाव टाकला; शरद पवारांचा पक्ष फोडला, सत्ता समीकरणासाठी बहुमताचा आकडा गाठला

गोगावलेंचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांना आत्मसमर्पण, तुरुंगात जावं लागणार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Maharashtra Tourism: मुंबईपासून १४० किमी अंतरावर आहे,सुंदर हिल स्टेशन; लोणावळाही विसराल

Fack Check : सलमान खानचा MIM मध्ये प्रवेश? व्हायरल व्हिडिओने बॉलिवूडसह राजकीय वर्तुळात खळबळ

१०८ कोटी घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, बारामतीत ईडीने टाकली धाड; घरात काय घबाड सापडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT