Thackeray brothers unite against vote rigging in upcoming civic polls Saam Tv
महाराष्ट्र

Thackeray Brothers: मतचोरीविरोधात ठाकरे बंधू मैदानात, कार्यकर्त्यांना मतदार याद्या तपासण्याचे आदेश

Raj Thackeray’s Big Claim: राहुल गांधींपाठोपाठ मतचोरीविरोधात ठाकरे बंधूंनीही एल्गार पुकारलाय. ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मतचोरी रोखण्यासाठी आदेश दिलेत. मतचोरीविरोधात राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Suprim Maskar

महापालिकांची प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्याचा दौरा केला. यावेळी ठाकरेंनी मतचोरीसंदर्भात पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देत मोठा गौप्यस्फोट केलाय.

दरम्यान राज ठाकरेंनी मतचोरीवरून विरोधकांसमोर ठेवलेल्या प्रस्तावाचीही आठवण करून दिली. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले

राज ठाकरे काय म्हणाले? - HDR

2016 पासून सांगतोय मतांमध्ये गडबड आहे

लोकसभेवर बहिष्कार टाका तेव्हा जागतिक बातमी होईल

बाहेरच्या देशातून दबाव येईल तेव्हा यांना जाग येईल

राहुल गांधींनी मत चोरी संदर्भात आवाज उठवला, त्याकडे लक्ष द्या

मतचोरीची चौकशी झाली पाहिजे, 10-12 वर्षांचा खेळ उघडा पडेल

दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही मतचोरीविरोधात रान उठवलंय.. कार्यकर्त्यांना याद्या तपासण्याचे आदेश दिलेत.. तर जोवर सत्य स्वीकारणार नाही, तोवर विरोधी पक्षांची अवस्था अशीच राहील, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलीय.

मतचोरीविरोधात ठाकरे बंधू मैदानात

मतचोरीविरोधात काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष मैदानात आलेला असताना ठाकरे बंधूही कार्यकर्त्यांना मतदार याद्या तपासण्याचे आदेश देत पुढे सरसावलेत. मतचोरीचा मुद्दा आणि ठाकरे बंधुंची वज्रमुठ त्यांना पालिका निवडणुकीत यश देणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Deodhar: 'तुझ्यात जीव रंगला' मधील अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं, फोटोंवरून नजर हटणार नाही

Nashik Guardian Minister: डोनाल्ड ट्रम्प सोडवणार नशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद; भुजबळ,भुसे की महाजन? कोणाला मिळेल संधी

Tuesday Horoscope:आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra weather : महाराष्ट्रात थंडी नेमकी कधी सुरू होईल? हवामानाचा अंदाज काय सांगतोय? जाणून घ्या

Latur News: शेत रस्त्याच्या वादावरून तिघांना जबर मारहाण.. कोयता, लाठ्याकाठ्यांनी हाणामारी|VIDEO

SCROLL FOR NEXT