Sakshi Sunil Jadhav
पैसा, धनदौलत, सौख्य या गोष्टी सर्वांनाच हव्या असतात .आपली रास ही काही त्याला अपवाद नाही.
"जे पेराल ते उगवते" असे म्हटलेले आहे. आज पराक्रम पेरा त्याचेच झाड येईल. व्यवसायामध्ये भाग्यकारक घटना घडणार आहेत.
काही काही वेळा "दुधात मिठाचा खडा" अशा काही गोष्टी येतात. सगळे छान चालू असताना धनाची आवक जावक उत्तम आहे.
प्रपंच करण्यासाठी असणाऱ्या गोष्टी आज चार हात लांब ठेवाव्या असे वाटेल. इतरांचे करता करता आपल्याकडे दुर्लक्ष करत आलो आणि म्हणून आज स्वतःकडे लक्ष द्याल.
"वाळू मधील रेघोट्या" असा काहीसा दिवस आहे. सगळे करून दिवसाच्या शेवटी हाती काही लागले नाही असा दिवस असेल. मनस्थिती ठीक ठेवावी लागेल. असेलच असे नाही.
सातत्याने चौकसपणा आणि हिशोबिपणा सगळीकडे कामास येत नाही काही वेळेला मोकळे पणाने जगून बघावे लागते. काळजी नसावी.
काही गोष्टी न ठरविता आज घडणार आहेत. समाजशी निगडित काहीतरी कार्य करावे अशी खुमखुमी येईल आणि त्या दृष्टीने पुढाकार सुद्धा घ्याल.
आयुष्यात कमी अधिक गोष्टी घडत राहतात. पण आज काही गोष्टी सोप्या होणार आहेत. भाग्यकारक घटना घडतील.
आज गुढतेची आवड निर्माण होईल. आज या विचाराने मन पछाडलेले असेल. गुप्तधनाविषयी सुद्धा गोष्टी आज जागृत होतील.
प्रेरणादायी प्रवास असावा असे आपल्याला नेहमी वाटते. आपल्या लोकांना बरोबर घेऊन संस्कार, सुशीलता सांभाळून आजपर्यंत संसार केला आहे.
काहीतरी पत्रकारिता आज तुमच्यामध्ये उपजेल .कधी कधी नव्याने शोधून काढणे, इतरांच्या गोष्टींमध्ये दखलबाजी करणे अशा गोष्टी आपल्या राशीला आवडतात.
प्रेमामध्ये बहार आहे.अर्थात आपली रास तशी आहे. काही गोष्टी संथपणे घडत राहतात. मात्र शेअर्स आणि लॉटरीमध्ये पैशाची गुंतवणूक करणार आहे.