Sakshi Sunil Jadhav
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे सगळ्यात प्रसिद्ध अभयारण्यांपैकी एक आहे. हे भारतातील सर्वात जुन्या ठिकाणांपैकी एक आहे. पुढे आपण या सुंदर अभयारण्याला भेट देण्यापुर्वी कोणत्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत याबद्दल जाणून घेणार आहोत.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे. नागपूरहून सुमारे १४० किमी अंतरावर असून, रस्ता आणि रेल्वे दोन्ही मार्गाने पोहोचता येते.
ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान आहे. १९५५ साली त्याला अभयारण्याचा दर्जा मिळाला आणि नंतर ''अंधारी'' भाग समाविष्ट करून व्याघ्र प्रकल्प तयार झाला.
ताडोबा हे बंगाल वाघांच्या समृद्ध लोकसंख्येसाठी ओळखले जाते. येथे वाघांच्या दर्शनाची शक्यता सगळ्या ठिकाणांपेक्षा जास्त आहे.
तुम्हाला अभयारण्यात वाघांबरोबरच बिबट्या, अस्वल, रानगवा, सांबर, रानडुक्कर आणि ३०० पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात.
येथे जीप सफारी आणि कॅन्टर सफारी असे दोन प्रकार आहेत. तुम्हाला यासाठी ऑनलाइन बुकिंग करणे आवश्यक आहे.
सफारी सामान्यतः सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ३ ते ६ या वेळेत होते. पावसाळ्यात काही गेट्स बंद असतात.
ताडोबा पार्कात मोहरली, कोलारा, खुतवाझा, बेलारा, अलिझांझा अशी विविध प्रवेशद्वारे आहेत. मोहरली गेट सर्वाधिक लोकप्रिय आहे.
ताडोबा भेटीसाठी ऑक्टोबर ते जून हा सर्वोत्तम काळ आहे. उन्हाळ्यात वाघ पाणवठ्याजवळ दिसण्याची शक्यता अधिक असते.
जंगलाजवळ अनेक रिसॉर्ट्स, होमस्टे आणि वनपरिसरातील गेस्टहाऊसेस आहेत. त्यासाठी तुम्हाला आधीच बुकींग करावी लागते. ऐनवेळी तिथे स्टे मिळणे कठीण आहे.
प्राणी, पक्षी यांना disturb करू नका. मोठ्याने बोलू नका, फ्लॅश लाइट वापरू नका आणि प्लास्टिक टाकू नका. जंगलाची स्वच्छता राखा.