CM Devendra Fadnavis and PM Narendra Modi Saam TV
महाराष्ट्र

Uddhav-Raj Thackeray: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचं पीएम मोदी, एकनाथ शिंदेंना निमंत्रण; ट्विट करत संजय राऊतांनी डिवचलं

Maharashtra Political News: ठाकरे बंधूंचा ५ जुलैला विजयी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे या बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

Bharat Jadhav

महायुती सरकारने त्रिभाषा धोरणाचा शासकीय निर्णय रद्द केला. सरकारच्या या निर्णयाविरोधात राज आणि उद्धव ठाकरे यांनी कडाडून विरोध केला होता. निर्णयाच्या विरोधात दोन्ही बंधूंनी मोर्चाचं हत्यार उपसलं होतं. पण ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीआर रद्द केला.

आपल्या दबावापुढे सरकार झुकले असून त्याचा विजयी जल्लोष ठाकरे बंधूंकडून केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदेंना डिवचलंय.

ठाकरे गट आणि मनसे पक्षाचा मेळावा वरळी डोम येथे होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालीय. ठाकरे बंधूंचा हा विजयी मेळावा ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह लक्ष लागलंय.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर या मेळाव्याची पोस्ट केलीय. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे शत्रू म्हटलंय. तसेच त्यांनी त्यांना या मेळाव्याचं आमंत्रण दिलंय. संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याचं पत्रक शेअर केलंय. या पत्रकामध्ये त्यांनी नागरिकांना वाजत-गाजत येण्याचं आवाहन केलंय.

संजय राऊत यांनी या विजयी मेळाव्याचं निमंत्रण पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक्सवर टॅग करत दिलंय. महाराष्ट्राच्या शत्रूंना आणि मराठीच्या मारेकऱ्यांना आव्हान आणि आवाज देणारी घडामोड. यावे जागराला यावे, असंही संजय राऊतांनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.

ठाकरे बंधूंचं नागरिकांना आवाहन

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एक पत्रक काढत सर्वांना आवाहन केलंय. आवाज मराठीचा, असं म्हणत मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं, कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं. आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT