Uddhav Thackeray and Raj Thackeray during crucial alliance talks ahead of Mumbai civic elections. Saam Tv
महाराष्ट्र

ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार? युतीचं ठरलं, जागावाटपावर अडलं

BMC Elections: महापालिका निवडणुकींसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय.. अशातच मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंची युती होणार आहे... युतीची घोषणा नेमकी कधी होणार? जागावाटपाचा तिढा कधी सुटणार? मातोश्रीवरच्या बैठकीत नेमकं काय झालं?

Suprim Maskar

२८८ नगरपालिकांच्या निवडणुकीत ठाकरेसेना दोन अंकी जागाही गाठू शकलेली नाही. त्यामुळेच येणारी महापालिका निवडणूक म्हणजे ठाकरे सेनेसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. यासाठीच ठाकरेसेना मनसेसोबत युती करून महापालिकेची सत्ता राखण्याची रणनिती आखतयं... त्यासाठी ठाकरे बंधूंच्या युतीच्या जाहीर घोषणेचा मूहुर्तही ठरलाय... मात्र मराठीबहुल वॉर्डांवरून ठाकरे बंधुंमध्ये पेच निर्माण झालेला आहे.

शिवडी मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 203, 204, 205 या जागावरून रस्सीखेच असून एक प्रभाग मनसेला दिला जाण्याची शक्यता आहे... तर माहिम विधानसभेत वॉर्ड क्रमांक 190, 192, 194 वरून ठाकरेसेना आणि मनसेत रस्सीखेच आहे.. त्याशिवाय विक्रोळी प्रभाग क्र. 114 वरूनही तिढा कायम आहे....

दुसरीकडे जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी युतीच्या घोषणेची तारीखचं जाहीर करून टाकलीय. दरम्यान जागावाटपाचा तिढा फार ताणू नका.. सामंजस्यानं जागावाटपावर निर्णय घ्या, असे आदेश ठाकरे बंधूंनी समन्वय समितीच्या नेत्यांना दिलेत...दुसरीकडे नगरपालिकांच्या निवडणुकीत कोकणात ठाकरेसेनेचा सुपडा साफ झालाय... उलट शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेसेनेनं कोकणात पक्षाचा चांगलाच विस्तार केलाय.या पालिका निवडणुकीत ठाकरेसेनेनं प्रचारात जोर लावल्याचं किंवा महत्वाच्या नेत्यांनी मतदारांना साद घातल्याचं पाहायला मिळालं नाही..त्याचा परिणाम निकालामधून सामोरा आलाच.

ठाकरे बंधूंचं घोडं जर युती आणि जागावाटपाच्या चर्चेत अडकून राहील तर मतदारांपर्यंत ठाकरे बंधू नेमके कधी पोहचणार? मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असं केवळ बोलून चालणार नाही तर ठाकरेसेनेला जमिनीवर उतरून आरपारची लढाई लढावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Divorce : प्रसिद्ध अभिनेत्रीचा 16 वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर शेअर केली भावुक पोस्ट

Pune Politics: पुण्यात राजकीय भूकंप! शरद पवारांना मोठा धक्का, प्रशांत जगताप यांचा राजीनामा

Ring Design : अंगठ्यांचे हे 5 लेटेस्ट डिझाईन्स; हातात घालताच प्रत्येकजण विचारेल, "कुठून घेतली?"

ठाकरे बंधूंची युती कधी होणार? संजय राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला|VIDEO

Bananas for diabetic patients: डायबेटिस पेशंटनं रोज केळी खावीत आणि किती खावीत? ब्लड शुगर वाढते? सगळ्या प्रश्नांचं १ उत्तर अन् दूर होतील सगळे गैरसमज

SCROLL FOR NEXT