Raj Thackeray/ Udhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्याच्या सभेला गर्दी नसते म्हणून राज ठाकरेंच्या सभेला अटी - राणे

'भाजप समुद्र असून समुद्राला अनेक नद्या भेट देतात, समुद्र त्या नंद्यांवर कधी कंडिशन घालत नाही.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनायक वंजारे -

सिंधुदुर्ग : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला १५ हजारांची मर्यादा घातली आहे, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, उद्धव ठाकरेंची सभा १२ ते १३ हजारांवर जात नाहीत आणि म्हणूचन त्यांनी राज ठाकरे यांच्या सभेला मर्यादा घातली असल्याच म्हणाले. ते आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी सवांद साधला.

ते म्हणाले, उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सभा १२ ते १३ हजारावर जात नाही आणि आपल्यापेक्षा दुसऱ्या पक्षाची मोठी सभा होऊ नये म्हणून त्यांनी राज ठाकरेंच्या सभेला फक्त १५ हजारांच्या उपस्थितीची अट घातल्याची खोचक टीका त्यांनी केली. तसंच त्यांनी यावेळी राज्य सरकारवर निशाणा साधला, राज्यात स्थिती चांगली नसून राष्ट्रपती राजवट तातडीने लागण्याची गरज असल्याचे सांगून जनतेने त्याचे स्वागत करायला हवे असं ते म्हणाले.

दरम्यान, मनसे-भाजप (MNS-BJP) युतीबाबतही त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, देशात सर्वात जास्त सभासद भाजपमध्ये आहेत. समुद्रात किती नद्या मिळतात, त्याप्रमाणे भाजप समुद्र असून समुद्राला अनेक नद्या भेट देतात, समुद्र त्या नंद्यांवर कधी कंडिशन घालत नाही. असं म्हणत त्यांनी मनसे-भाजप युतीबाबत सकारात्मता दाखवली.

हे देखील पाहा -

राज्यातल्या लोकांना संरक्षण मिळावं, राज्यात हत्या दरोडे किती वाढत आहेत. विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम चालू आहे. राणा दाम्पत्य देशद्रोही असा यांनी शोध लावला, नवाब मलिक (Navab Malik) देशद्रोही नाही. दाऊदशी संबंध असलेला देशद्रोही नाही. हे सरकार जायलाच पाहिजे. म्हणून लवकरच राष्ट्रपती राजवट लागायला पाहिजे आणि लागत असेल तर जनतेने स्वागत केले पाहिजे. मंत्रालयात जाऊन बसत नाही तो मुख्यमंत्री कसला. उद्धव ठाकरे यांचे राज्यात मुख्यमंत्री म्हणून शून्य काम आहे. असा मुख्यमंत्री होऊ नये अशी जहरी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेचे ठेकेदारांनी अर्धवट काम करून बिल काढली

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT