येलदरी धरणाचे दहा दरवाजे उघडले; मोठ्या प्रमाणात नदीपात्रात विसर्ग  Saam TV
महाराष्ट्र

येलदरी धरणाचे दहा दरवाजे उघडले; मोठ्या प्रमाणात नदीपात्रात विसर्ग

रविवारी सकाळी जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत.

राजेश काटकर

परभणी: रविवारी सकाळी जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याद्वारे वीजनिर्मिती सह २१०९८.६५ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. सद्यस्थितीत धरण शंभर टक्के भरलेले असून गेले काही दिवसांपासून येलदरी धरणाच्या पाणीपातळीत घट होत असल्याने वीजनिर्मिमिती द्वारे होणारा विसर्ग कायम ठेवत दरवाज्यातून होणारा विसर्ग कमी करून कधी दोन, कधी चार दरवाज्यातून विसर्ग सोडण्यात येत असताना गुरुवारी दुपारी सर्वच बंद करण्यात आले होते. परंतु धरणातील पाणीपातळी हळूहळू वाढू लागली त्यामुळे शनिवारी रात्री अकरा वाजता पुन्हा दोन दरवाजे अर्धा मीटरपर्यंत उचलण्यात आले.

परंतु धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असल्याने पाणीपातळीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे आज (ता.१७) सकाळी सव्वा आठ वाजता आणखी चार दरवाजे उघडले. याप्रमाणे सहा दरवाज्यामधून १२६५०.८९ क्युसेक्स विसर्ग चालू करण्यात आला होता. त्यानंतर काही तासातच म्हणजे दुपारी बारा वाजता उर्वरित चारही दारे उघडण्यात आले. त्यामुळे आता दहाही दरवाजे अर्धा मीटरपर्यंत उचलून त्याद्वारे २१०९८.६५ आणि वीजनिर्मितीद्वारे २७०० असा एकूण २३ हजार ७९८.६५ क्युसेक्स (६७३.९० क्युमेक्स) विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा येलदरी धरण, पूर नियंत्रण कक्षाकडुन देण्यात आला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: बाईक की टेम्पो! दुचाकीवरून ८ जणांचा प्रवास, पोलिसांनी जोडले हात, व्हिडीओ पाहून हैराण व्हाल!

PM Awas Yojana: PM आवाससाठी आता पोर्टलवरून अर्ज! १.८० लाखांची सबसिडी मिळणार, प्रक्रिया आणि कार्यप्रणाली कशी आहे?

Ajit Pawar : ताईंना CM करण्यासाठी अजित पवारांना बदनाम केलं, फडणवीसांचा आरोप, सुप्रिया सुळेंचा पलटवार

Shani Margi 2024: शनीच्या मार्गी चालीने अडचणी वाढणार; 'या' राशींवर राहणार शनिदेवाचं सावट!

Rohit Sharma: रोहित शर्माच्या घरी आला 'ज्युनिअर हिटमॅन', रितिकाने दिला मुलाला जन्म

SCROLL FOR NEXT