Pandharpur Accident Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur Accident : दुर्दैवी! रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशीच बहीण भावाचा अपघातात मृत्यू

Pandharpur News: सोमवारी होणाऱ्या रक्षाबंधनासाठी आलेल्या बहिणीला कारमधून गावाकडे घेऊन जात असताना पंढरपूर जवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

भरत नागणे

सोमवारी होणाऱ्या रक्षाबंधनासाठी आलेल्या बहिणीला कारमधून गावाकडे घेऊन जात असताना पंढरपूर जवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये मंगळवेढा येथील बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी पंढरपूर जवळच्या गोपाळपूर येथे झाला. तात्या जाधव आणि ऋतुजा जाधव, असं या अपघातातील मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तात्या जाधव हा तरूण आपली बहीण ऋतुजा जाधव हिला कारमधून मंगळवेढा येथे घेऊन जात होता. त्याचवेळी बहिण भावावर काळाने घाला घातला.

पंढरपूरहून मंगळवेढाकडे निघालेल्या कारला समोरून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. यामध्ये कारचा चक्काचूर झाला. यामध्ये बहीण भाऊ जागीच ठार झाले आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अकोल्यात कार पलटी होऊन भीषण अपघात

दरम्यान, अकोल्यात वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळ भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी घडली होती. भरधाव वेगात जात असलेल्या कार वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार पलटी होऊन भीषण अपघात झाला. अपघातात जण 1 ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले होते. जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोला जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मुर्तीजापुर तालुक्यातल्या पैलपाडा गावाजवळ आज शनिवारी सायंकाळी सडे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मुर्तीजापुर येथून अकोल्याच्या दिशेने चौघेजण कारने येत असताना वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार पलटी होऊन हा अपघात झाल्याचे समजते आहे. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT