Sangli News
Sangli News Saam Tv
महाराष्ट्र

MPSC परिक्षेचा निकाल जाहीर; प्रमोद चौगुले राज्यात पहिला

विजय पाटील

सांगली - जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोनी येथील प्रमोद बाळासाहेब चौगुले यांनी दुसर्‍या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या MPSC च्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यानंतर त्यांच्या सोनी येथील मूळ गावी आणि सांगलीतील घरी मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. प्रमोद चौगुले त्यांचे प्राथमिक शिक्षण सोनी झाले. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पलूस येथील नवोदय विद्यालय झाले. त्यानंतर त्यांनी कराड येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी घेतली. (Sangli Latest News In Marathi)

हे देखील पाहा -

उच्चशिक्षित प्रमोद चौगुले यांची भारत पेट्रोलियममध्ये निवड झाली होती. चौगुले यांनी जामनगर येथे सेवा बजावली आहे. भारत पेट्रोलियममध्ये काम करत असताना येणार्‍या वेगळ्या अधिकार्‍यांच्या संपर्कातून त्यांना स्पर्धा परीक्षेची प्रेरणा मिळाली. त्यांनी यूपीएससीची तयारी केली परंतु त्यांना त्यामध्ये यश आले नाही. परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या राज्यसेवेच्या परीक्षेत मात्र त्यांनी केवळ दुसर्‍या प्रयत्नात घवघवीत यश मिळवत पहिल्या क्रमांकावर बाजी मारली. पहिल्या प्रयत्नात यांची एका मार्कात संधी हुकली होती. त्याची कसर भरून काढत त्यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे.

प्रमोद चौगुले यांचे वडील बाळासो चौगुले हे ड्रायव्हर आहेत. तर आई घरी शिवन काम करते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत प्रमोद चौगुले यांनी यश मिळवले आहे. तर प्रमोद चौगुले यांचे मेहुणे प्रसाद चौगुले हे गेल्यावर्षी जाहीर झालेल्या राज्यसेवेच्या निकालात राज्यात प्रथम आले होते. त्यांचे सध्या पुण्यात उपजिल्हाधिकारी पदाचे प्रशिक्षण सुरु आहे. गेल्यावर्षी मेहुणे तर यावर्षी प्रमोद चौगुले हे राज्यसेवेच्या परिक्षेत राज्यात प्रथम आल्याने कुटुंबात जल्लोषाचे वातावरण होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raver News : केळीला भाव नसल्याने कर्ज फेडीची विवंचना; तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन

Anjali Arora : 'कच्चा बादाम' फेम अंजली अरोरा साकारणार सीता मातेची भूमिका

Actor Shekhar Suman joins BJP: अभिनेते शेखर सुमन यांनी केला भाजपा पक्षात प्रवेश

Baramati Lok Sabha: बारामतीकरांना ४ जूनला गोड बातमी मिळेल; आमदार रोहित पवारांना विश्वास

Maharashtra Election 2024: सातारा लाेकसभा मतदारसंघात पैसे वाटप झाल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, Video

SCROLL FOR NEXT