Actor Shekhar Suman joins BJP: मोठी बातमी ! अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Shekhar Suman joins BJP : बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देत शेखर सुमन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
Actor Shekhar Suman joins BJP
Actor Shekhar Suman joins BJPSaam Tv

बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन यांनी आज मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देत शेखर सुमन यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी शेखर सुमन यांनी पटणा लोकसभा मतदार संघात काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.

Actor Shekhar Suman joins BJP
Ankita Lokhande Trolled : ‘स्वत:ला माधुरी दीक्षित नको समजू...’, धकधक गर्लच्या लूकमध्ये आली अंकिता लोखंडे, नेटकऱ्यांनी सुनावलं

शेखर सुमन यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी शेखर सुमन यांच्यासोबत राधिका खेरा यांनीही पक्षप्रवेश केला आहे. त्यांनी २ दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना त्यांनी राम मंदिरात जाण्यावरून काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुली यांनी भाजप पक्षात पक्ष प्रवेश केला होता.

शेखर सुमन यांच्या कामाबद्दल बोलायचे तर, ते एक सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आहेत. त्यांनी ९० च्या काळातील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारलेली आहे. अभिनेते शेखर सुमन ‘इंडियाज् लाफ्टर चॅम्पियनशिप’मध्ये दिसले होते. त्यासोबतच संजय भन्साळी यांच्या ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ वेबसीरीजमध्येही प्रमुख भूमिकेत आहेत.

Actor Shekhar Suman joins BJP
Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणात महत्वाची अपडेट; राजस्थानमधून पाचव्या आरोपीला अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com