लातुरमधील मातृभक्ताचं 'आईप्रेम'; मृत्यूनंतर आईच्या आठवणीत बांधलं मंदिर Saam TV
महाराष्ट्र

लातुरमधील मातृभक्ताचं 'आईप्रेम'; मृत्यूनंतर आईच्या आठवणीत बांधलं मंदिर

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं आपण म्हणतो. कारण आईची जागा देवापेक्षा कमी नसते आणि तेच लातुरमधील एका कुटुंबियांनी त्याच्या कृतीमधून करुन दाखवलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लातूर : आई ही सर्वांनाच आवडणारी आणि ती आवडण्याचं कारण तिचं आपल्यावती असणारं अमर्याद प्रेम होय आणि याच आई-मुलांच्या पवित्र नात्याला साजेसं काम लातूरमधील एका मातृभक्ताने केलं आहे.

लातूर जिल्ह्यातील चाकूरमध्ये आपल्या आईच्या प्रेमापोटी तिच्या आठवणींमध्ये एका मुलाने चक्क मंदिर उभारलं आहे. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असं आपण म्हणतो. कारण आईची (Mother) जागा देवापेक्षा कमी नसते आणि तेच लातुरमधील एका कुटुंबियांनी त्याच्या कृतीमधून करुन दाखवलं आहे.

तर या मुलाचे कृत्य हे आपल्या आई-वडिलांचा साभाळ न करणाऱ्या मुलांना विचार करायला लावणारं आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील चाकूर येथील काशीबाई सोनटक्के याचं २ वर्षांपूर्वी निधन झालं आहे. त्यानंतर त्यांचा मुलगा शिवकुमार याने आईच्य़ा आठवणींमध्ये तिचं मंदिर उभारलं आहे. तसंच काशीबाई जीवंत असतानाही त्यांच्या मुलांनी त्यांची चांगली सेवा केली होती.

हे देखील पहा -

आई-वडिलांची सेवा कशी केली जाते याचा आदर्श शिवकुमार आणि त्यांच्या भावांनी घालून दिला आहे. काशीबाईंना तीन मुले आणि तीन मुली आहेत. या सर्व मुलांच त्यांच्यावर अत्यंत प्रेम आहे. आणि म्हणूनच ज्यावेळी त्यांची आई या मुलांना सोडून गेल्यावरती देखील मंदिराच्या माध्यमातून ते आपल्या आईची सेवा पुर्णमनोभावे श्रद्धा फुलं वाहून करतात.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT