NANDED FAMILY TRAGEDY IN SANGAREDDY: THREE KILLED IN HORRIFIC NH-161 ROAD ACCIDENT  Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : महामार्गावर भयंकर घडलं! कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू, १ गंभीर

Nanded Accident News : तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग १६१ वर झालेल्या भीषण अपघातात नांदेडच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. हैदराबाद विमानतळाकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.

Alisha Khedekar

  • तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात NH-161 वर भीषण कार अपघात

  • नांदेडच्या बागबान कॉलनीतील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

  • जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

संजय सूर्यवंशी, नांदेड

तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यात मंगळवारी पहाटे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वर भीषण अपघात झाला. या अपघातात नांदेडच्या एका कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

नांदेड शहरातील बागबान कॉलनी येथील एक कुटुंब कारने हैदराबादकडे जात होते. संगारेड्डी जिल्ह्यातील बचूपल्ली परिसरात अचानक एक दुचाकी कारसमोर आली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून ती अनेक वेळा पलटी झाली. त्यानंतर कार दुभाजकावर आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन अदळली.

या भीषण अपघातात मौलाना मोहम्मद नदीम, त्यांची आई शमीमा बेगम आणि चार वर्षांची मुलगी अनाबिया तस्कीन यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे धाकटे बंधू नविद गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कारमधील इतर काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. सऊदी अरबियातुन हैदराबाद एयरपोर्ट येथे पोहोचलेल्या आपल्या नातेवाईकांना घेण्यासाठी हे कुटुंब जात होते. मात्र वाटेतच हा दुर्दैवी अपघात झाला. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT